सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संघकार्य हीच काकाजींची जीवननिष्ठा होती : नितीन गडकरी

संघकार्य हीच काकाजींची जीवननिष्ठा होती : नितीन गडकरी स्व. शंकरलालजी खंडेलवाल जन्मशताब्दी समारोहाचे उद्घाटन

Snehal Joshi .
  • Aug 1 2020 6:51PM
स्व. शंकरलालजी उपाख्य काकाजी खंडेलवाल यांची संघकार्य हीच जीवननिष्ठा होती. संपूर्ण जीवन ते आदर्श स्वयंसेवक म्हणून जगले. संघाच्या प्रत्येक कार्यात त्यांची स्वयंसेवक म्हणून प्रेरणा असे. देशाला, समाजाला पुढे कसे नेता येईल, समाजाचा विकास हे त्यांचे आत्मचिंतन राहिले व हजारो कार्यकर्त्यांना जीवन जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली, असे विचार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
अकोला येथील स्व. शंकरलालजी खंडेलवाल जन्मशताब्दी समारोहाचे ना. गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जितेंद्रनाथ महाराज, वसंतराव खंडेलवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. एक सफल व्यवसायी म्हणून यशस्वी गाथा काकाजींच्या जीवनात दिसते, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- संघाचे कोणतेही कार्य असो, त्या कार्यामागे तनमनधनाने काकाजी उभे राहिले. आपल्या विचारानुरूप अनेक कार्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संघाचे विविध क्षेत्रात सुरु असलेली कामे त्यांनी सर्वव्यापी बनविली. काकाजींसारख्या स्वयंसेवकांनी जो त्याग केला, त्यामुळेच आज आपल्या कार्याला प्रतिष्ठा मिळाली. अत्यंत प्रतिकूल असलेल्या त्या काळात काकाजींनी विचारधारेच्या आधारावर कार्यविस्तार केला. ते आमच्यासाठी आदर्श आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.
ज्या देशासाठी, समाजासाठी स्व. काकाजींनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्या विचारांनी प्रेरित होऊन काकाजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करू, हीच त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांना श्रध्दांजली ठरेल असे सांगून ना. गडकरी म्हणाले- आज आमच्या विचारधारेला देशात, विश्वात जी प्रतिष्ठा मिळाली आहे, ती काकाजींसारख्या स्वयंसेवकांच्या समर्पित कार्यामुळे, त्यागामुळे मिळाली आहे. त्यासाठी काकाजींसारख्या स्वयंसेवकांचे समर्पित कार्य आम्ही विसरू शकत नाही. त्यांनी आपले जीवन राष्ट्राच्या पुननिर्माणासाठी दिले. या राष्ट्राला सुखी, संपन्न, शक्तिशाली बनविण्यासाठी, विश्वाची महाशक्ती बनविण्यासाठी अनेक पिढ्यांपासून सुरु असलेल्या कार्याची प्रेरणा काकाजी होते. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने हे कार्य दीर्घ काळापासून सुरु आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
या देशाने, संघाने अनेक संकटांचा सामना केला. पण राष्ट्र बलशाली बनविण्याचे डॉ. हेडगेवारांच्या प्रेरणेने सुरु असलेले कार्य त्यांनी पुढे नेले, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आज एक स्वयंसेवक पंतप्रधान झाला. परिवर्तनाची ही प्रक्रिया संपली नाही. या राष्ट्राला जोपर्यंत आत्मनिर्भर बनवता येणार नाही, देशात सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही, तोपर्यंत डॉ. हेडगेवारांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. नक्षली, दहशतवादी, नैसर्गिक अशा अनेक संकटांवर मात करून आम्ही पुढे जात आहोत. आता कोविड-19 चे संकट आम्ही जिंकू, आर्थिक संकटही आम्ही जिंकू. आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी गाव गरीब मजूर शेतकरी यांचे कल्याण करू. स्मार्ट गावे बनवू. गावातून शहराकडे कुणी जाणार नाही. तंत्रज्ञानाचा विकास करून पुढे जाऊ. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे आता आमच्या देशाचे भविष्य आहे, असेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार