सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाचे संक्रमण न होता जीवन जगावे लागेल : नितीन गडकरी

लॉकडाऊन प्रभावी उपाय नाही एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत

Snehal Joshi .
  • Jul 31 2020 9:02PM
कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर, विश्वावर आहे. सकारात्मकता आणि आत्मविश्वास यामुळे या संकटाचा सामना करीत पुढे जावे लागेल व जीवनही जगावे लागेल. कोरोनाचे संक्रमण न होता जीवन कसे जगता येईल, याची पध्दती विकसित करावी लागणार आहे. कारण लॉकडाऊन हा या संकटावर मात करण्याचा प्रभावी उपाय नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यत केले.
एका मराठी वृत्तवाहिनीला रात्री दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यत केले. एक मीटरचे अंतर, मास्क आणि हात सॅनिटायझरने धुणे हे नियम पाळावे लागतील, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अनेक संकटावर देशातील लोकांनी मात केली आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करून त्यातून आपण पुढे आलो आहे. या संकटावरही मात करावी लागेल. सकारात्मकता आणि आत्मविश्वास सोडता कामा नये. माध्यमांची भूमिका यात महत्त्वाची असणार आहे. कोरोनामुळे सर्वच जण संकटात आहे. केंद्र- राज्य सरकारांचा महसूल कमी झाला आहे. बँका तणावाच्या स्थितीत आहेत, स्थलांतरित मजुरांसमोर जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. केंद्र-राज्य सरकारांनी जी मदत करायची ती केली आहे. पण मदत करण्यासही मर्यादा आहे, याकडे लक्ष वेधताना ना. गडकरी म्हणाले- लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटही वाढणार आहे. ते कोविडपेक्षाही मोठे असेल. जोपर्यंत यावर प्रतिबंधक लस शोधली जाणार नाही, तोपर्यंत या संकटाचा सामना करायचा आहे. अर्थव्यवस्थाही जिवंत ठेवावी लागेल आणि जगावेही लागेल, असेही ते म्हणाले.
केंद्र शासनाने जन धन योजनेत ३८ कोटी खाते उघडले आहेत. त्या खात्यात पैसे जमा करून मदत केली. अन्नधान कुठेही कमी पडू दिले नाही. विविध बँकांच्या आधारे मदत करण्याचा प्रयत्न केला. पण यालाही मर्यादा आहेत, असे सांगताना ते म्हणाले- कोरोनाच्या स्थितीचे कुणी राजकारण करू नये. राजकीय विवाद देशाचे हिताचे नाहीत. राफेल ही चांगली विमाने आहेत. त्यात कोणताही गैरव्यवहार झाला नाही, असेही ना. गडकरी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. रामराज्य आणि शिवशाही या विषयाबद्दलच्या एका प्रश्नाच्या उत्तरात ना. गडकरी म्हणाले- छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते. ते आमचे दैवत आहे. श्रीरामही सर्व बाबतीत आदर्श होते. आदर्श समाज-देश निर्माण झाला पाहिजे अशी कल्पना म. गांधी यांनी मांडली होती. रामराज्य हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने जे करायचे ते करीत आम्ही पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले.

बॉस
मुंबई-गोवा महामार्ग १०० वर्षे चांगला राहील
मुंबई-गोवा महामार्गावर एका ठिकाणी पावसामुळे सेंट्रीग खाली पडले. याची चौकशी होणार आहे. काम अजून पूर्ण झाले नाही. हा महामार्ग १०० वर्षे चांगला राहील या शब्दावर मी अजूनही कायम आहे. कामाच्या दर्जात कोणताही समझोता नाही. कंंत्राटदाराने काम चांगले केले नसेल तर कारवाई होईल. या संदर्भातील तांत्रिक अहवाल आल्यावर त्यात दोषी असेल त्यावर कारवाई होईल, असे ना. गडकरी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार