सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा : नितीन गडकरी

भारतातील रस्ते विकासासोबतच इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक वाढला पाहिजे. डिझेलवरून आता लोकांनी सीएनजीवर यावे. यामुळेच वाहतुकीवर होणार्‍या खर्चात बचत होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Snehal Joshi
  • Jul 28 2020 2:48PM
भारतातील रस्ते विकासासोबतच इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक वाढला पाहिजे. डिझेलवरून आता लोकांनी सीएनजीवर यावे. यामुळेच वाहतुकीवर होणार्‍या खर्चात बचत होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारतातील रस्त्यांचा विकास यावर तज्ञांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- रोजगार निर्मिती हे आमच्या देशासमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. जोपर्यंत उद्योग निर्मिती वाढणार नाही, तोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाहीत. यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठ़ी बाजारात आणि विविध क्षेत्रात खेळते भांडवल येणे आवश्यक आहे. बाजारात खेळते भांडवल यावे यासाठी सार्वजनिक खाजगी आणि परकीय गुंतवणूक विविध क्षेत्रात होणे आवश्यक आहे. यामुळेच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद तसेच पायाभूत सुविधा या क्षेत्रात गुंतवणुकीच्या क्षमता अधिक आहेत. रस्त्यांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निधीची कमतरता नाही, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- भूसंपादन आणि विविध विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे हे कठीण काम रस्ते बांधकाम क्षेत्रात आहे. त्यातच वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे जिकिरीचे असते. अशा स्थितीतही आम्ही 30 किमी दररोज रस्ता बांधकाम करीत आहोत. यापूर्वीच्या केंद्र सरकारात हे काम दररोज 2 ते 3 किमीच होत होते. 22 राष्ट्रीय हरित महामार्ग आम्ही बांधत आहोत. दिल्ली मुंबई एक्सप्रेस महामार्गाचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. 120 किमी प्रती तास या वेगाने या महामार्गावरून जाता येईल. पण वाहतूक करताना इंधन खर्चात बचत महत्त्वाची ठरणार आहे. या मार्गावर चालणारे ट्रक जर सीएनजीवर चालले तर 50 टक्के इंधन खर्चात बचत होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाला तरीही इंधन खर्चात बचत होईल. यापुढेही माल वाहतुकीसाठी जलमार्ग वाहतुकीचा वापर वाढला, तर इंधन खर्चात उल्लेखनीय बचत होणार आहे. वाहतूक क्षेत्रात आता परिवर्तन होत आहे. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान याचा वापर करून हे शक्य आहे. या परिवर्तनासाठी ही योग्य वेळ आहे, त्याशिवाय आपण 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेपर्यंत जाऊ शकणार नाही. हाच आत्मनिर्भरतेचाही मार्ग आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार