सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्था निर्माण व्हाव्यात : नितीन गडकरी

लहान उद्योगांना कर्जपुरवठ्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्था  निर्माण व्हाव्यात : नितीन गडकरी उत्तर भारतीय चार्टर्ड अक़ौंटंटशी ई संवाद

Snehal Joshi .
  • Jul 27 2020 11:21PM
आर्थिक आणि सामाजिक मागासलेल्या क्षेत्रातील अत्यंत लहान लहान उद्योगांना कर्जपुरवठा करून आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्था निर्माण व्हाव्यात. त्यामुळे या उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्जपुरवठा शक्य होईल व या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आपण यासाठी प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
उत्तर भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे मोठे संकट अर्थव्यवस्थेवर व समाजमनावर आले आहे. समाजात भीती, नैराश्य पसरले आहे. नैराश्याच्या गर्तेतून समाजाला बाहेर काढणे आपली जबाबादारी आहे. सर्वांनी मिळून आत्मविश्वास जागवला पाहिजे. आजपर्यंत देशाने अनेक संकटांवर मात केली आहे. नैसर्गिक संकटांचा आणि नक्षलवाद व दहशतवादी कारवाया अशा संकटांचाही मात केली आहे. या संकटामुळे आर्थिक व्यवस्था पुढे नेण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. हे दीर्घ काळ चालणारे संकट असल्यामुळे यासोबत जीवन जगण्याची पध्दती आत्मसात करावी लागणार आहे. अशा स्थितीतच मागास व अविकसित असलेल्या कृषी, ग्रामीण व आदिवासी भागातील भाजीवाले, फेरीवाले, चर्मकार, दूध विक्रेते अशा लहान लहान व्यावसायिकांना सूक्ष्म आर्थिक साह्य उपलब्ध झाले पाहिजे. त्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे. या संदर्भात अनेक तज्ञांशी आपली चर्चा झाली असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
या लहान व्यावसायिकांना 5 ते 10 लाखांपर्यंत कर्जाचीच आवश्यकता असते, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या उद्योगांना कर्जपुरवठा व्हावा म्हणून सामाजिक वित्तीय संस्था सु़रु करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या संस्थांना रिझव़्र्ह बँकेने परवाना द्यावा. प्रत्येक शहरातील एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे या संस्थांवर नियंत्रणाची जबाबदारी देण्यात यावी. ज्या संस्थांचे काम चांगले आहे, त्या संस्थांना 10 लाखांपेक्षा अधिक कर्जपुरवठा करण्याची परवानगी भविष्यात देता येईल. लहान व्यावसायिक व उद्योगांना सध्याच्या काळात कर्जपुरवठा झाला तरच सामााजिक आर्थिकदृष्ट्या मागास कृषी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील उद्योग सुरु होऊन रोजगार निर्माण होेईल. मागास भागातील गरीब जनतेचे वैयक्तिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही ना. गडकरी म्हणाले.
भारत आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. इतरांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलावी लागेल, असे सांगताना ना. गडकरी यांनी उच्च तंत्रज्ञान, कौशल्य विकास, नवीन संसोधन, मोठी बाजारपेठ या देशात आहे. आता उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक आली तर देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. भारतात परकीय गुंतवणुकीसाठी सध्या योग्य वेळ आहे. कारण या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो, याकडेही ना. गडकरींनी लक्ष वेधले.
 
रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग
क्षेत्र महत्त्वाचे : नितीन गडकरी
रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग व्यापारी असो.शी संवाद
नागपूर, 27 जुलै
सध्याच्या जीवनात रेफ्रीजरेशन आणि एअर कंडशनिंग व्यवसाय महत्त्वाची भमिका बजावत आहे. सर्वच क्षेत्रात या वस्तूंची गरज निर्माण झाली आहे. औषध क्षेत्र, दूध क्षेत्र, भाजीपाला, कोल्ड स्टोरेज अशा क्षेत्रात रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग उद्योग महत्त्वाचा ठरला आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- संपूर्ण जगच कोरोनाच्या विळख्यात आहे. अर्थव्यवस्थेसमोरही अनेक प्रकारची संकटे निर्माण झाली आहेत. व्यापारी, उद्योजक, वित्तीय संस्था, बँका सर्वांसमोर कोरोनाचे संकट उभे आहे आणि सर्वच जण याचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने आपल्याला पुढे जायचे आहे आणि अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे. लोकांच्या मनात असलेली भीती आणि नैराश्य दूर सारण्यास मदत करायची आहे. पुन्हा एकदा जाोमाने उभे राहायचे आहे. शासन आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कोरोनासारख्या संकटातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसमोर अडचणी सोडविण्यासाठी शासनाने एमएसएमई मार्फत 3 लाख कोटींचे पॅकेज दिले आहे. याचा फायदा या उद्योगांना होत असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- समाधानकारक प्रगती असलेल्या उद्योगांना उद्योगासाठी भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही एमएसएमई स्टॉक एक्स्चेेंची कल्पना आणली. या संकल्पनेतून उद्योगांना शेअर बाजारातून भांडवल उभे करता येईल. एअर कंडीशनिंगसाठी ऊर्जा भरपूर लागते. या खर्चात कशी बचत करता येईल, यासाठ़ी या व्यावसायिकांनी प्रयत्न करावा. या व्यवसात पुढे जाण्याच्या खूप क्षमता आहे. त्या क्षमतांचा उपयोग करून भारतीय अर्थव्यवस्थेला साह्य करावे, असे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार