सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतरकरण्याची गरज : नितीन गडकरी

सुपर इकॉनॉमिक पॉवर हे आपले स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य दृष्टिकोनातून विकास व्हावा आणि हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचेही ना. गडकरी म्हणाले

Snehal Joshi .
  • Jul 25 2020 2:16PM
कोरोना विषाणूचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. अर्थव्यवस्था संकटात आली असतानाच अशा स्थितीत कोरोनाच्या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याची गरज आहे. 1947 पूवीं आणि नंतर आपल्या देशातील जनतेने अनेक समस्यांचा आणि संकटांचा सामना केला आहे. त्या सर्व संकटांवर मात करून आपण उभे राहिलो आहे. कोरोनाच्या संकटावरही आपण आत्मविश्वास व सकारात्मकतेने मात करू असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
भगवान महावीर विद्यापीठ सूरतच्या विद्यार्थी-प्राध्यापक आणि भारत विकास परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी ते पुढे म्हणाले- कोरोनामुळे समाजात नैराश्य, नकारात्मकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण समाजात आम्हाला आत्मविश्वास प्रस्थापित करावा लागेल. आर्थिक युध्दाचा सामना करीत असतानाच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत या दिशेने काम करीत आहोत. आज देशातील तरुण वर्गाला तांत्रिक आणि व्यासायिक शिक्षण देण्याची गरज आहे. देशातील ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, संशोधन, नाविन्य, यशस्वी प्रयोग हे प्रकारचे ज्ञान असून या ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याची गरज आहे, असे ना. गडकरी म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्था ही गतीने प्रगतीकडे जाणारी अर्थव्यवस्था असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अद्ययावत तंत्रज्ञान आणि खर्चात बचत, तसेच अधिक निर्यात देशाच्या अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात आपण पक्के उभे राहू शकणार नाही. इच्छाशक्ती असेल तर पैसा नसला तरी कामे होतात, हे सांगताना त्यांनी सागरमाला या योजनेचे उदाहरण दिले.
देशातील  60 टक्के लोकसंख्या आज ग्रामीण भागात वास्तव्य करीत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ही लोकसंख्या आज गरिबीशी संघर्ष करीत आहेत. यासोबतच या जनतेसमोर रोजगाराची मोठी समस्याही निर्माण झाली आहे. या दोन्ही समस्या सोडविण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी या भागात नवीन उद्योगांचे जाळे आणि पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. त्यामुळे या क्षेत्राचा जीडीपी वाढेल आणि आर्थिक व सामाजिक समता निर्माण होईल. ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या वस्तूंवर आधारित उद्योग निर्मिती झाली पाहिजे. उदा. जैविक इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा ग्रामीण भागातूनच प्राप्त होतो. यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करून जैविक इंधन निर्मितीकडे आपण अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे., असेही ते म्हणाले.
भारताने आधुनिकीकरण स्वीकारले आहे. पण पाश्चातीकरणाच्या आपण विरोधात असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- अद्ययावत तंत्रज्ञान, विज्ञान, कौशल्य, अधिक निर्यात, नवीन संशोधन, उद्योजकता, यशस्वी प्रयोग या मार्गाने आपण पुढे गेलो तर देश सुखी, समृध्द, संपन्न, शक्तिशाली होऊ. सुपर इकॉनॉमिक पॉवर हे आपले स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य दृष्टिकोनातून विकास व्हावा आणि हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार