सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतमाल उत्पादक कंपनीने खर्चात बचत करून शेतकर्‍यांना समृध्द करावे : नितीन गडकरी

शेतमाल उत्पादक कंपनीने (फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) सर्व प्रकारच्या खर्चात बचत करून शेतकर्‍यांना अधिक नफा मिळेल, या दृष्टीने नियोजन करून शेतकर्‍यांना समृध्द करावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Snehal Joshi .
  • Jul 24 2020 5:43PM
शेतमाल उत्पादक कंपनीने (फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) सर्व प्रकारच्या खर्चात बचत करून शेतकर्‍यांना अधिक नफा मिळेल, या दृष्टीने नियोजन करून शेतकर्‍यांना समृध्द करावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने एमएसएमईच्या पुढाकाराने 1500 शेतकरी एकत्र येऊन शेतमाल उत्पादक कंपनीची (फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) नवीन संकल्पना आणली आहे. या संकल्पनेबाबत चर्चा करताना ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. या संकल्पनेतून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणार, उत्पादन वाढणार आणि शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळणार. काही शेतकरी एकत्र येऊन ही कंपनी अमरावती जिल्ह्यात स्थापन झाली आहे. मालाची निर्मिती, तपासणी आणि प्रशिक्षण या कंपनीत मिळणार आहे. उत्पादित मालाला बाजारात नेण्यासाठज़ी एक कॉमन फॅसिलिटी सेंटरही तयार केले जाणार आहे. 1 लाख शेतकरी या कंपनीशी जोडले जातील. सध्या ही कंपनी दाळ (पल्सेस) आणि बेसन निर्मितीसाठी काम करणार आहे. 18 कोटींचे अनुदान एमएसएमईचे देण्यात येणार असून 22 कोटींचा हा प्रकल्प आहे. या कंपनीचा माल निर्यात करता येईल असा दर्जाचा राहणार असल्याचे एमएसएमईचे संचालक पार्लेवार अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. यावेळी खा. विकास महात्मे व अनेक शेतकरी ऑनलाईन या कार्यक्रमाशी जोडले गेले होते.
यावेळी ना. गडकरी पुढे म्हणाले- नवीन विकासदृष्टी घेऊन शेतकर्‍यांना कर्जापासून मुक्त करून आार्थिकदृष्ट्या स्वावलंबी करता येईल. कृषी क्षेत्रात व्यावहारिक समस्या काय आहेत, त्यासाठी काय करता येईल, याचा विचार या कंपनीमार्फत झाला पाहिजे. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी काय करायची गरज आहे, याचाही विचार झाला पाहिजे. तसेच काही शेतकर्‍यांनी एकत्र येऊन एक ‘इक्विपमेंट बँक’ तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
‘इक्विपमेंट बँके’मार्फत शेतकर्‍याच्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी लागणार्‍या सर्व खर्चात बचत करता येईल. शेतकर्‍याच्या उत्पादन खर्चापासून, बाजारात माल जाईपर्यंत लागणारा सर्व प्रकारचा खर्च कमी करता येणे शक्य आहे. उदा. इंधन खर्च, वाहतूक खर्च, विजेसाठी होणारा खर्च, प्रशासनावर होणारा खर्च असा सर्व प्रकारच्या खर्चात बचत झाली तरच या कंपनीचा नफा वाढेल. पण खर्चात बचत करीत असताना मालाच्या दर्जात कुठेही समझोता नको. तसेच आकर्षक पॅकेजिंग आणि मार्केटिंगही या मालाचे झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हा माल टिकणार नाही.  शेतमाल उत्पादक कंपनीने डाळी तयार केल्यानंतर त्या सरळ अमरावतीहून मुंबई, चेन्नई, बंगलोर या शहरांमध्ये रेल्वेने पाठवाव्या म्हणजे वाहतूक खचार्चत 20 टक्के बचत होईल. खारपाण पट्ट्यातील डाळीची चव वेगळी असते. त्याचे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग, मार्केटिंग चांगले झाले पाहिजे. घरगुती (डोमॅस्टिक) बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात हा माल टिकला पाहिजे असा प्रयत्न झाला पाहिजे. दर्जा उत्तम आणि दर माफक असेल तर  मालाची विक्री अधिक होईल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
तसेच शेतकर्‍यांनी रासायनिक खते आणि औषधांपेक्षा सेंद्रीय खते औषधे वापरावी याकडे अधिक भर देण्याचा प्रयत्न करावा, यासाठी ही कंपनी अधिक प्रयत्नशील हवी, असे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, आापल्या घरीच सेंद्रीय खत तयार करा. ज्या जिल्ह्यात जो माल अधिक पिकतो, त्या पध्दतीचे तंत्रज्ञान विकसित करून जिल्हाश: एक दृष्टिकोन शेतकर्‍यांना देता येईल काय, हा विचारही कंपनीने केला पाहिजे. हे करताना गावे समृध्द कशी होतील, स्मार्ट व्हिलेज कसे निर्माण होतील याचाही प्रयत्न झाला पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार