अमॅझॉन ग्लोबल सेलिंग एक्स्पोर्ट डायजेस्टचे विमोचन
अमॅझॉन ग्लोबल सेलिंग एक्स्पोर्ट डायजेस्ट 2020’चे विमोचन आज व्हिडिओ कान्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
भारतात परकीय गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा काळ उत्तम असून परकीय गुंतवणूकदारांनी भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. भारतातील गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरू शकते, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘अमॅझॉन ग्लोबल सेलिंग एक्स्पोर्ट डायजेस्ट 2020’चे विमोचन आज व्हिडिओ कान्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अॅमझॉनचा भारतीय अर्थव्यवस्थेत निर्यातीसाठी महत्त्वाचा सहभाग असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- भारतीय अर्थव्यवस्था ही गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. देशात उच्च तंत्रज्ञान आहे, कौशल्याधारित मनुष्यबळ आहे, मोठी बाजारपेठ आहे, पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद या सुविधाही आहे. परकीय गुंतवणुकीसाठी ही स्थिती अत्यंत चांगली आहे, असेही ते म्हणाले.
एमएसएमईची व्याख्या बदलली असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- उत्पादन निर्मिती आणि सेवा क्षेत्र आम्ही आता वेगळे केले आहे. सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांमध्ये यापूर्वी असलेल्या उलढालीची मर्यादा वाढवली आहे. येत्या 5 वर्षात आम्ही 30 टक्के असलेले सकल राष्ट्रीय उत्पन्न 50 टक्केपर्यंत, निर्यात 48 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत तर 5 कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय अॅग्रो एमएसएमईची संकल्पना आणली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील सूक्ष्म उद्योगांचा विकास आणि उद्योग मजबूत करण्यात येतील. कृषी आणि आदिवासी क्षेत्रातील कच्चा मालाच्या आधारे लहान उद्योग सुरु होऊ शकतात. देशातील 60 टक्के लोकसंख्या आज कृषी आणि ग्रामीण भागात राहाते. अॅग्रो एमएसएमईच्या माध्यमातून या भागाचा औद्योगिक विकास शक्य होईल. एमएसएमईची उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची करून या उद्योगांना मुख्य प्रवाहान आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांमध्ये खूप क्षमता आहे असेही ना. गडकरी म्हणाले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प