सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लहान व्यवसायी, फेरीवाले यांना भांडवलउपलब्ध करणारे स्वतंत्र धोरण हवे : नितीन गडकरी

व्यावसायिकांना लाख-दोन लाखांपर्यंतच्या भांडवलाची आवश्यकता असते. त्यावर त्यांचा व्यवसाय व कुटुंब चालते. त्यांना कुणी कर्जपुरवठा करीत नाही. या लोकांना भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे.

Snehal Joshi .
  • Jul 20 2020 11:07PM
देशातील लहान व्यवसायी, फेरीवाले यांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल उपलब्ध व्हावे असे धोरण हवे. या व्यावसायिकांना लाख-दोन लाखांपर्यंतच्या भांडवलाची आवश्यकता असते. त्यावर त्यांचा व्यवसाय व कुटुंब चालते. त्यांना कुणी कर्जपुरवठा करीत नाही. या लोकांना भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘पॅन आयआयटी ग्लोबल ई कॉन्क्लेव्ह’मध्ये ना. गडकरी ई संवादाच्या मध्यमातून बोलत होते. ते पुढे म्हणाले- लहान व्यावसायिक, फेरीवाले, भाजीवाले यांची कर्जाची गरज अत्यंत थोडी आहे. ते प्रामाणिक आहेत, कर्ज भरण्यास तयार आहे. पण त्यांना कर्ज देण्यास वित्तीय संस्था तयार नाहीत. बँकांच्या कर्ज प्रक्रियांमध्ये खूप वेळ जातो, त्यामुळे हे लोक बँकांकडे वळत नाही. यातून रोजगार निर्मिती होते. या व्यावसायिकांमध्ये कौशल्य आहे, मेहतन करण्याची तयारी आहे. पण त्यांना भांडवल उपलब्ध होत नाही. अर्थव्यवस्थेत या व्यावसायिकांचाही मोठा सहभाग असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले आहे. येथील लोकांचे दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे. त्यामुळेच या भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) कमी आहे. या क्षेत्रात आरोग्य, शिक्षणाच्या  सुविधा देण्याची गरज असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान, प्रशिक्षण देऊन उद्योग सुरु झाले तर येथील तरुण रोजगारासाठी शहरांकडे कशाला धावतील? तेथे गरिबी ही समस्या आहे. या क्षेत्रातील लहान उद्योजकांना वित्तीय मदत करण्याची भूमिका हवी. इच्छाशक्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या व्यावसायिकांना मदत केली गेली पाहिजे. लहान वित्तीय संस्थांमार्फत या लोकांना भांडवल उपलब्ध व्हावे. आम्ही अनेक योजना त्यांच्यासाठी तयार करणार आहोत. या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी योग्य तंत्रज्ञान शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी दोन प्रकारची धोरणे तयार करावी लागणार आहेत. एक शहरी भागासाठी तर एक कृषी-ग्रामीण-आदिवासी भागासाठी असले पाहिजे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार