सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहराचा चौफेर विकास, पण ही फक्त न्यूज रिल : ना. गडकरी

शहराचा चौफेर विकास, पण ही फक्त न्यूज रिल : ना. गडकरी हिंगणा टी पॉईंट ते छत्रपतीनगर चौक रस्त्याचे लोकार्पण

Snehal Joshi .
  • Jan 25 2021 11:02PM
शहरात सुमारे 1800 कोटींची कामे झाली असून रस्ते, पूल, उड्डाणपूल, सिमेंट रस्ते, मेट्रो, डबल डेकर
पूल, फुटाळ्यावर जागतिक दर्जाचे कारंजे अशी विविध कामे सुरु असून शहराचा चौफेर विकास होत
आहे. हे शहर देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त शहर बनविणार आहे. पण ही फक्त न्यूज रील आहे खरा चित्रपट अजून शिल्लक आहे. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला म्हणून ही कामे आम्ही करू शकलो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व
एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हिंगणा टी पॉईंट ते छत्रपती चौक या रस्त्याचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी खा. दत्ता मेघे, आ. प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आ. अनिल सोले, माजी आ. सुधाकर देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय मार्ग निधीतून ही सर्व कामे होत आहेत. भांगे हॉल त्रिमूर्तीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रचंड जनता उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- या ऐतिहासिक रिंग रोडसाठी 450 कोटी रुपये मंजूर झाले
आहे. तसेच वाडीनंतर एमआयडीसीपर्यंत 2 किमीचा रस्ता पुन्हा मंजूर केला आहे. या रिंगरोडशिवाय
दुसर्‍या रिंगरोडसाठी 1200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे कामही सुरु आहे. मेट्रोच्या
खाली डबल डेकल पूलही झाशी राणी चौकाजवळ होईल. तिसरा डबल डेकर पूल कामठी रोडवर
होणार आहे. आता अंबाझरी तलाव ते हिंगण्यापर्यंत आणि जयताळापर्यंत जुना रिंगरोड वाढविणार असून हे दोन्ही रस्ते सिमेंटचे होतील.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहराच्या विकासााठी 1000 कोटी रुपये दिले. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, डॉ. आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर, जगदंबा संस्थान कोराडी या संस्थाना पुरेसा निधी देण्यात आला आहे. 60 खेळाची मैदाने, फुटाळा तलावावर जागतिक दर्जाचे कारंजे, मेट्रो-2 ला मंजुरीअसा शहराचा चौफेर विकास करण्यात येत असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले-आज लोकार्पण होत असलेला रिंगरोड ग्रीन रोड म्हणून विकसित करण्यात येणार आहे. झाडे लावणे सुरु आहे. नगरसेवकांनी 5 झाडे जगविण्याची जबाबदारी शहरातील जनतेने द्यावी असेही ते म्हणाले.
नागपूरचे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय बनावे अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- या कामाचेटेंडर राज्य शासनाने रद्द केले. त्यांनी पुन्हा टेंडर काढावे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण विमानतळ हे आंतरराष्ट्रीय झाले पाहिजे. नागनदीसाठी 1700 कोटी रुपये मंजूर झाले असून अंबाझरीपासून स्वच्छ पाण्यातून बोटीने प्रवास करणे शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस
शहराच्या विकासात ना. नितीन गडकरी यांचा बहुमोल वाटा असल्याचे सांगताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र
फडणवीस म्हणाले- केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत 275 कोटी सिमेंट रोडसाठी दिले. आता पुढची 50 वर्षे
या रस्त्यावर खड्डा पडणार नाही. खरे तर काँक्रीटची संस्कृती ही ना. गडकरी यांनीच आणली आहे.
डांबरीकरण रस्त्यावरील खड्डे बुजवताना नाकी नऊ येतात. आज रस्ते, पूल, उड्डाणपूल बांधण्यासाठी
काँक्रीटचे नवे डिझाईन आणि जगातील चांगले तंत्रज्ञान गडकरी पहिल्यांदा नागपुरात आणतात व नंतर
देशात वापरतात. त्यामुळे गडकरींच्या नेतृत्वात शहराचा चेहरा बदलविण्याचे काम झाल्याचे आपल्याला
पाहायला मिळते. जगातील विकसित होणार्‍या शहरांमध्ये नागपूरचे नाव आले आहे ते केवळ
गडकरींमुळेच, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार