सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मनपाने खेळांना अधिक प्रोत्साहन द्यावे : ना. नितीन गडकरी

मनपाने खेळांना अधिक प्रोत्साहन द्यावे : ना. नितीन गडकरी भारत व्यायाम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन

Snehal Joshi .
  • Jan 17 2021 10:21PM
नागपुरात खेळांना आणि खेळाडूंनाही अधिक प्रोत्साहन मिळावे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यादृष्टीने 60 खेळांच्या मैदानांसाठी तसेच नासुप्रच्या 7 खेळांच्या मैदानासाठी निधी उपलब्ध करून दिला. महापालिकेने खेळांना अधिक प्रोत्साहन दिले तर चांगले खेळाडू नागपुरात निर्माण होतील, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
चिटणीस पार्कातील भारत व्यायाम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके व व्यायाम शाळेचे अध्यक्ष जाधव, माजी महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते. चिटणीस पार्क मैदानाशी माझी जवळचा संबंध आहे. या मैदानावर आम्ही खेळलो, असे सांगताना ना. गडकरी यांनी आपल्या लहानपणाच्या आठवणींच्या स्मृती जागवल्या. भारत व्यायाम शाळा आणि नागपूर व्यायाम शाळा या दोन्ही शाळांनी अनेक पहेलवान तयार केले. खोखो, कबड्डीसाठीही या मैदानांनी चांगले खेळाडू शहराला दिले. खेळाच्या क्षेत्रात नागपुरात चांगले काम व्हावे, चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी आपण प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
पूर्व आणि मध्य नागपुरात आता मैदानांसाठी जागाच नाही, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- 125 कोटी रुपये खर्च करून एक मोठी अ‍ॅकेडेमी सुरु होणार आहे. यासाठी मनपाने जागा दिली आहे. कबड्डी-खोखो, अ‍ॅथ्लेटिक्स अशा सर्व खेळांचे प्रशिक्षण येथे मिळावे असा प्रयत्न यातून आहे. खेळांमुळे व्यक्तिमत्त्व तयार होते, स्वभावांमध्ये बदल होतो. यासाठीच खेळ संस्कृतीत वाढ व्हावी ही आमची जबाबदारी आहे. महाल क्षेत्राला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा मिळाला आहे. ती परंपरा पुन्हा जागृत करावी. तसेच कबड्डी, खो खो हे आपले राष्ट्रीय खेळही अधिक खेळले जावे याकडेही लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
भारत व्यायाम शाळेने पुन्हा कुस्त्यांची दंगल घडवून आणावी अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- नागपूर सर्व क्षेत्रात पुढे जावे अशी माझी इच्छा आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार