सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खादी ग्रामोद्योगच्या वेदिक पेंटचा थाटात शुभारंभ ना. नितीन गडकरी

एक गाय, एक कडूनिंबाचे झाड आणि एक परिवार या आधारावर अर्थव्यवस्था उभी करू ना. नितीन गडकरी खादी ग्रामोद्योगच्या वेदिक पेंटचा थाटात शुभारंभ

Snehal Joshi .
  • Jan 13 2021 12:04AM
12 जानेवारी
ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक गाय, एक कडू निंबाचे झाड आणि एक परिवार या आधारावर नवीन अर्थव्यवस्था उभी करून सर्व आधुनिक तंत्रज्ञान गावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यामुळेच ग्रामीण आणि मागासलेल्या भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढून देशाची प्रगती होईल, हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे गायीच्या शेणापासून निर्माण करण्यात आलेल्या इमल्शन आणि डिस्टेंपर पेंटचा शुभारंभ आज नवी दिल्लीत ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंग, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना व अन्य उपस्थित होते.याप्रसंगी ना. गडकरी यांनी कृषी, ग्रामीण, आदिवासी आणि मागासलेल्या भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना म्हटले की, मागासलेल्या मागाचा सामाजिक, आर्थिक विकास हेच आत्मनिर्भरतेकडे जाणारे पाऊल आहे.
तीस टक्के लोक ग्रामीण भारताकडून शहरी भारताकडे का गेले, याचा विचार केला तर लक्षात येते की रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध न झाल्यामुळे हे स्थलांतर झाले आहे. आता ग्रामीण आणि कृषी, मागासलेला भागात  रोजगार निर्मिती करून शहरी भागाचे ग्रामीण भागाकडे स्थलांतर करणे क्रमप्राप्त आहे, हे संभव होऊ शकते. गरिबी निर्मूलन ही आमची मोहीम आहे. ग्रामोद्योग आणि कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे, राजकारणाचा सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी उपयोग करून हा बदल शक्य आहे. पुन्हा लोक शहरांकडून गावांकडे परततील, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.
ना. प्रतापचंद्र सारंगी
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यानी आपल्या भाषणात गायीचे महत्त्व सांगून गाय ही मानव समाजासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी वरदान असल्याचे सांगितले. गायीच्या शेणात चमत्कारी शक्ती असल्याचेही ते म्हणाले. खादी ग्रामोद्योग आयोगाचा हा क्रांतिकारी आविष्कार असून भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारे पाऊल आहे.
ना. गिरीराज सिंग
केंद्रीय पशुपालन व डेअरी उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग म्हणाले- आमच्या पूर्वजांनी गायीच्या शेणाचे महत्त्व सांगितले आहे. शेण हे भिंतीसाठी आधीपासून वापरले जात आहे. आज तांत्रिक दृष्ट्या ते सिध्द झाले आहे. पेंट बनविणार्‍या अन्य कंपन्यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाकडून हे तंत्रज्ञान घ्यावे, असेही ते म्हणाले.
विनयकुमार सक्सेना
खादी ग्रामोद्योग आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा पेंट बनविला असल्याचे सांगताना आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना म्हणाले- अत्यंत साध्या तंत्राने हा पेंट बनविला असून देशातील मान्यताप्राप्त पेंट कंपन्यांच्या उत्पादनाच्या बरोबरीचा हा पेंट आहे. केवळ पेंट बनविणे हा उद्देश नसून हजारो रोजगार निर्माण करणे आणि लोकांना स्वस्त व उत्तम दर्जाचे उत्पादन उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे, असेही ते म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार