सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ना. गडकरी यांच्या हस्ते 11 हजार कोटींच्या 33 महामार्गाच्या प्रकल्पाचे उद्घाटन-भूमिपूजन

प्रकल्पांमध्ये 1197 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात या राज्यात 900 किमीहून अधिक राष्ट्रीय महामार्गांचा समावेश झाला असून आता कर्नाटकातील महामार्गांची एकूण लांबी 7652 किलोमीटर झाली आहे.

Snehal Joshi .
  • Dec 21 2020 11:08PM
राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी कर्नाटकमधील 11 हजार कोटींच्या 33 राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडले.
या प्रकल्पांमध्ये 1197 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात या राज्यात 900 किमीहून अधिक राष्ट्रीय महामार्गांचा समावेश झाला असून आता कर्नाटकातील महामार्गांची एकूण लांबी 7652 किलोमीटर झाली आहे. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा, केंद्रीय महामार्ग राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंग व अन्य मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे 37 हजार 311 कोटींच्या खर्चाचे 71 प्रकल्प प्रगतीपथावर असून ही कामे झाल्यानंतर 2384 किमी लांबी महामार्गांची अधिक होईल. यापैकी 1127 किमी लांबीच्या 12286 कोटी रुपये खर्चाच्या 26 प्रकल्पांची कामे 70 टक्के झाली असल्याचेही याप्रसंगी ना. गडकरी यांनी सांगितले.
व्यापार आणि अर्थव्यवस्थेसाठी बंदरांची सुलभ कनेक्टीव्हिटी गोवा ते केरळ सीमेपर्यंत , बेलेकरी, कारवार व मंगलोर या शहरांना जोडणार्‍या 278 किमी लांबीच्या 3443 कोटी रुपये खर्चाच्या संपूर्ण लांबलचक किनारी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग 75 यावरील डोंगर उतारावरील शिर्डी घाट, महामार्ग 73 वरील चार्मदी घाट व महामार्ग 275 वरील संपाजे घाट या तीनही कामांना मान्यता देण्यात आली आहे.
1,11,144 कोटींची गुंतवणूक
येत्या काही वर्षात कर्नाटकात सुमारे 1,11,144 कोटी रुपयांची गुंतवणूक महामार्ग प्राधिकरण या राज्यात करणार असल्याची माहिती देताना ना. गडकरींनी देताना सांगितले की, 2019-21 मध्ये 5083 कोटी ़रुपयांच्या खर्चाचे एकूण 275 किमी लांबीच्या 11 रस्ते प्रकल्प या राज्यात देण्यात आले आहेत. देशातील मुख्य ऊस उत्पादक राज्यांपैकी एक मोठे ऊस उत्पादक राज्य म्हणून कर्नाटकने इथेनॉल उत्पादन हाती घ्यावे अशी सूचनाही ना. गडकरी यांनी यावेळी केली. धान्यापासून इथेनॉल निर्मितीची परवानगीही आता शासनाने दिली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडेल शिवाय इंधनाला स्वदेशी पर्याय निर्माण होईल, असेही ते म्हणाले. राज्यमंत्री डॉ. व्हि. के. सिंग यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार