सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करावा : ना. गडकरी

अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करावा : ना. गडकरी एमएसएमईचे दहावे अधिवेशन

Snehal Joshi .
  • Dec 11 2020 11:12PM
अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करून देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दहाव्या एमएसएमई अधिवेशनात ना.गडकरी ‘एमएसएमईसाठी नावीण्यपूर्ण समाधान- आव्हाने आणि संधी’ या विषयावर बोलत होते. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे हे देशाचे भविष्य असल्याचे सांगताना ते म्हणाले- देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पनात एमएसएमई 30 टक्के योगदान आहे, ते आता वाढवून 40 टक्केपर्यंत नेणे, 48 टक्के निर्यात 60 टक्क्यांवर नेणे व 5 कोटी नवीन रोजगार निर्मिती करणे हे आमचे मिशन आहे. यासाठी ग्रामीण-कृषी आणि आदिवासी अर्थव्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. इलेक्ट्रिक कार, बस, ऑटोरिक्षावर आपण आलो आहे. लवकरच ट्रकही इलेक्ट्रिकवर आणण्याचे प्रयत्न आहेत. पण इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे चुंबक मात्र चीनमध्ये आयात करावे लागते. या चुंबकाची देशात निर्मिती करण्यात आली, तर आयातीला पर्याय निर्माण होईल. हे काम अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी नवीन संशोधनाच्या माध्यमातून करू शकतात, असेही ते म्हणाले.
देशात साखर, तांदूळ, मका याचे ÷उत्पादन खूप आहे. त्यामुळेच या धान्याचा साठाही मुबलक आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- या धान्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जावी. 1600 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असताना आपण फक्त 450 कोटी लिटरच इथेनॉल निर्माण करू शकतो. कच्च्या तेल आयातीला यामुळे पर्याय निर्माण होईल. प्रदूषण होणार नाही आणि आपण या क्षेत्रात आत्मनिर्भर बनू शकतो. तसेच आमचे खादी डेनिम आज अमेरिकेत लोकप्रिय आहे. लिवाईस कंपनीने या खादीचा वापऱ करून आकर्षक डिझाईनचे कपडे तयार केले. या कपड्यांना खूप मागणी आहे. नवीन संशोधनातून नाविण्यपूर्ण वस्तू बनवून त्या जागतिक बाजारात कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याची संधी आपल्याकडे आहे, असेही ते म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था की वेगाने प्रगतीकडे जाणारी असल्याचे सांगताना नाा. गडकरी म्हणाले- एमएसएमई देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान, कौशल्य या माध्यमातून कमी किंमतीत दर्जेदार उत्पादन एमएसएमईच्या माध्यमातून होऊ शकते. सॅनिटायझरचे उदाहरण देताना ना. गडकरी म्हणाले- सॅनिटायझरच्या बाटलीचा पंप महत्त्वाचा आहे. पण हा पंप आपल्याला चीनमधून आयात करावा लागतो. हा पंप आपण देशात बनवू शकत नाही? अशा लहान लहान गोष्टी देशाला आत्मनिर्भर बनवू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार