सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्रामीण उत्‍पादनांना विपणन व तंत्रज्ञानाशी जोडण्‍याची गरज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हिंदी विश्‍वविद्यालयात ‘वर्धा मंथन 2021’ चे उद्घाटन ग्रामीण उत्‍पादनांना चालना देण्‍यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच विपणन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्यम मंत्री श्री नितीन गडकरी यांनी शनिवारी वर्धेत केले.

Snehal Joshi .
  • Feb 6 2021 8:00PM

गाव समृद्ध करणे, युवकांना रोजगार देणे तसेच कृषिमध्‍ये सुधारणा करण्‍याकरिता संचार, समन्‍वय आणि सहयोग या त्रिसूत्रीवर काम करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण उत्‍पादनांना चालना देण्‍यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच विपणन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्यम मंत्री श्री नितीन गडकरी यांनी शनिवारी वर्धा

येथे केले. ते म्‍हणाले की पेट्रोल व डीजलला पर्याय म्‍हणून सीएनजी, इथेनॉल, बायोगॅस यांना प्रोत्‍साहन दिले पाहिजे. विदर्भातील नागपुर, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा जिल्‍हयांना डीजल मुक्‍त करण्‍याचे आवाहन श्री गडकरी यांनी केले. वर्धेत शेतक-यांना समृद्ध करण्‍यासाठी खाद्य प्रसंस्‍करणाच्‍या माध्‍यमातून येथील भाजीपाला दुबई व कॅनडात पाठविला जात आहेत. वर्धेचा ‘गोरस पाक’ पॅकेजिंग व ब्रांडिंगच्‍या माध्‍यमातून जागतिक पातळीवर पोहचू शकतो असेही ते म्‍हणाले. श्री गडकरी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘वर्धा मंथन 2021 :

ग्राम स्‍वराजची आधारशिला’ या विषयावर आयोजित दोन दिवसाच्‍या राष्‍ट्रीय कार्यशाळेच्‍या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल होते. यावेळी मंचावर महात्‍मा गांधी केंद्रीय विश्‍वविद्यालय, मोतिहारी (बिहार)चे कुलाधिपती तथा खादी व ग्रामोद्योग आयोगाचे माजी अध्‍यक्ष डॉ. महेश शर्मा, वर्धेचे खासदार श्री रामदास तडस, विनोबा भावे यांचे सचिव राहिलेले बालविजय भाई यांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री श्री गडकरी म्‍हणाले की आम्‍हाला काळानुरूप

स्‍वत:मध्‍ये परिवर्तन केले पाहिजे. गाव, शेतकरी आणि कारागी यांना केंद्रस्‍थानी ठेऊन धोरणे ठरविली पाहिजेत. राजकारण सत्‍तेसाठी नसून समाजात परिवर्तन करण्‍याचे एक उपकरण होय. गांधी, विनोबा, दीनदयाल उपाध्‍याय, दत्‍तोपंत ठेंगड़ी यांच्‍या सारख्‍या चिंतकांप्रमाणे सत्‍तेचे राजकारण सोडून आम्‍हाला राष्‍ट्रकरणाचे काम केले पाहिजे. खादी क्षेत्रात नवोन्‍मेष वाढवून खेडी समृद्ध होतील. आम्‍हाला रोजगार, शिक्षण व आरोग्‍य क्षेत्रात सुधारणा करण्‍याची गरज आहे. जोवर गाव, गरीब, मजूर, शेतकरी आत्‍मनिर्भर होणार नाहीत तोवर देश आत्‍मनिर्भर होणार नाहीत. आत्‍मनिर्भर भारताकरिता प्रतिभावंत युवकांना प्रेरित करुन ग्रामीण भागात पाठविले पाहिजे असेही ते म्‍हणाले.

डॉ. महेश शर्मा म्‍हणाले की, आज आर्थिक असमानता वाढली आहे. पंतप्रधान मोदी जी यांनी आत्‍मनिर्भर भारताचा मार्ग दाखविला आहे. सरसंघचालक मोहन भागवतजी हे सुद्धा स्‍वावलंबनावर भर देतात असे ते म्‍हणाले. वर्धेचे खासदार श्री रामदास तड़स म्‍हणाले, गांधीजींनी प्रण केला होता की देश स्‍वतंत्र होत नाही तोवर साबरमती आश्रमात जाणार नाही. गांधीजी वर्धेत आले आणि येथेच राहून त्‍यांनी 14 वर्षेपर्यंत ग्राम विकासाला दिशा दिली. बालविजय भाई म्‍हणाले की गांधी व विनोबा यांनी ग्राम स्‍वराजचा पाया वर्धेच रचला.

ग्राम स्‍वराजचे ब्‍लू प्रिंट ‘वर्धा मंथन’ या कार्यशाळूतून मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल म्‍हणाले की ग्राम विकास हा समाजसेवा, सामाजिक सुधारणा, तंत्रज्ञान आणि राजकारण यासारख्‍या विविध क्षेत्रात काम करणा-या लोकांचा एक मंच आहे. 1934 मध्‍ये महात्‍मा गांधी यांनी स्‍पष्‍ट केले होते की माझ्या जीवनाचा एकमेव उद्देश रचनात्‍मक कार्यक्रम हे आहे.

भारताचे स्‍वातंत्र्य हे केवळ सत्‍ता परिवर्तन नव्‍हे तर रचनात्‍मक कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून सभ्‍यता परिवर्तनाचे एक यज्ञ होय. भारत केवळ शेतकरी शेतमजुरांचा नव्‍हे तर कारागीरांचा देश आहे असेही ते म्‍हणाले. ‘वर्धा मंथन’च्‍या माध्‍यमातून शेतकरी, कारागीर, शिल्‍पकार यांच्‍यावर चर्चा करुन स्‍वावलंबी व आत्‍मनिर्भर भारताची संकल्‍पना यावर दस्‍तावेज तयार होऊ शकेल असे ते म्‍हणाले. ‘वर्धा मंथन 2021’ चे उदघाटन 6 फेब्रुवारी

रोजी श्‍यामा प्रसाद मुखर्जी भवनातील कस्‍तूरबा सभागृहात करण्‍यात आले. यावेळी दिलीप केळकर व आशीष गुप्‍ता यांचे पुस्‍तक ‘ग्राम विकास-भारतीय दृष्टि’ व डॉ. अर्चना यांचे पुस्‍तक ‘दैशिक शास्‍त्र‘ यांचे विमोचन करण्‍यात आले. संचालन प्रकुलगुरु डॉ. चंद्रकांत रागीट यांनी केले तर आभार म.गां. फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्‍ययन केंद्राचे निदेशक प्रो.

मनोज कुमार यांनी मानले. कार्यशाळेचे संयोजक डॉ. के. बालराजु यांनी देशभरातील ग्रामीण विकासाशी संबंधित कार्यकर्त्‍यांचे स्‍वागत केले. दीप दीपन व विश्‍वविद्यालयाच्‍या कुलगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

राष्‍ट्रगीताने उदघाटन कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यशाळेचा समारोप 07 फेब्रुवारीला दुपारी 4.15 वा. होईल. यावेळी मुख्‍य अतिथी म्‍हणून शिक्षणतज्‍ज्ञ व माजी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी ऑनलाइन उपस्थित राहतील. इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र, नवी दिल्‍लीचे अध्‍यक्ष श्री राम बहादुर राय समारोपीय भाषण करतील.

अध्‍यक्षस्थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल राहतील. संचालन डॉ. के. बालराजु करतील तर प्रो. मनोज कुमार आभार मानतील. प्रो. हरीश अरोरा कार्यशाळेचे प्रतिवेदन सादर करतील. यावेळी ‘वर्धा संकल्‍प’ पत्राची घोषणा प्रो. मनोज कुमार करतील. यावेळी डॉ. के. बालराजु व डॉ. शिव सिंह बघेल संपादित ‘ग्राम विकास के अभिनव प्रयोग’ पुस्‍तकाचे लोकार्पण करण्‍यात येईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार