सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*महिलांना रोजगारासाठी मार्गदर्शन करा--केंद्रीय मंत्री गडकरी*

महिलांना रोजगार कसा मिळेल.या महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील,यासाठी त्या महिलांना दिशा देण्याचे कार्य भाजप महिला मोर्चाने करावेत

Snehal Joshi
  • Jun 29 2020 12:00AM
विविध प्रकारचे कौशल्य असलेल्या समाजातील महिलांना रोजगार कसा मिळेल.या महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील,यासाठी त्या महिलांना दिशा देण्याचे कार्य भाजप महिला मोर्चाने करावेत असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एम. एस. एम. ई. मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा श्री गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. जोपर्यंत यावर प्रतिबंधक लस निर्माण होत नाही. तोपर्यंत योग्य नियम पाळून कोरोना सोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार आहे. असे सांगताना गडकरी म्हणाले आत्मनिर्भर भारत म्हणजे प्रत्येकाने आपल्या पायावर उभा राहून स्वावलंबी होण्याची ही संकल्पना आहे. विविध प्रकारचे कामे त्या करू शकतात. विविध कलागुण महिलांमध्ये आहेत. ती कला विकसित करून त्याचा उपयोग रोजगार किंवा स्वावलंबी होण्यासाठी कसा होईल. हे काम महिला आघाडी ला करायला करायचे आहे. हे मोठे काम आहे असेही ते म्हणाले. महिलांनी कोणता उद्योग करावा,त्याच्या अंगात कोणते कलागुण आहेत. याची माहिती करून घ्यावी. MSME तर्फे मी या कामात मदत करायला तयार आहे. विविध योजनांची माहिती महिला आघाडीने घ्यावी व त्याप्रमाणे इच्छुक महिलांना त्यांनी मार्गदर्शन करून दिशा द्यावी. विविध वस्तू बनविण्याचा उद्योगही महिला करतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा दर्जा उत्तम असावा. दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जाऊ नये. तरच या वस्तू बाजारात टिकाव धरतील. व आपल्याला बाजाराचा फायदा मिळेल. हा आत्मनिर्भर भारताचा मार्ग आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा देखील हाच मार्ग असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार