सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लघु, मध्यम व सूक्ष्म व्यवसायात खाद्यपदार्थ निर्मितीला विशेष मागणी.-* गडकरी

खवय्यांच्या जगतात नवनवीन खाद्यपदार्थ लोकांना हवे असतात. म्हणूनच पाश्चात्य देशातले खाद्यपदार्थ देखील आपल्या देशात स्वीकारली जातात. लघु, मध्यम व सूक्ष्म व्यवसायात अन्य खाद्यपदार्थ प्रक्रियेला विशेष भाव आहे. त्यात नव-नवे संशोधनाची आवश्यक आहे.

Snehal Joshi
  • Jun 23 2020 11:32PM
खवय्यांच्या जगतात नवनवीन खाद्यपदार्थ लोकांना हवे असतात. म्हणूनच पाश्चात्य देशातले खाद्यपदार्थ देखील आपल्या देशात स्वीकारली जातात. लघु, मध्यम व सूक्ष्म व्यवसायात अन्य खाद्यपदार्थ प्रक्रियेला विशेष भाव आहे. त्यात नव-नवे संशोधनाची आवश्यक आहे. तसेच खवय्यांना लागणारी पदार्थांची चव लक्षात घेता या उद्योगातील उद्योजकांनी खाद्यपदार्थ बनवावे, असे मत फूड प्रोसेसिंग, इंडस्ट्रीच्या पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले . मागील तीन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्र आर्थिक अडचणीत आले आहे. . यापूर्वीही आम्ही अनेक समस्यांशी चार हात केले. त्यामुळे कोरोनाची भीती आणि नैराश्य दूर सारून समस्येचा सामना करावा लागणार आहे. आत्मविश्‍वास कायम ठेवायचा आहे. कोरोनासोबत जीवन जगण्याची पद्धत स्वीकारायची आहे. आपल्याला सर्व कामे करावी लागणार आहेत. असेही ते म्हणाले. या क्षेत्राचा शेतकर्‍यांनाही अधिक फायदा होतो, असे सांगताना गडकरी म्हणाले. खाद्यपदार्थांसाठी लागणारा कच्चा माल शेतकर्‍यांकडूनच मिळतो. या उद्योगातही नवीन संशोधन झाले तर आपली उत्पादने निर्यातयोग्य होतील. एमएसएमईल अनेक उद्योगांंची नोंद आहे. ज्यांच्या उद्योगाची नोंद नसेल त्यांनी नोंद करावी. या विभागाची व्याख्याच आम्ही बदलून टाकली आहे. त्यामुळे फूड उद्योगालाही याचा फायदा घेता येईल. अन्न खाद्य उद्योगाने वाहतूक खर्च, कामगार खर्च, विजेचा खर्च कमी केला गेला पाहिजे. तसेच दर्जाच कोणताही समझोता नको. तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण टिकू शकतो , असेही ते म्हणाले. MSME फंड ऑफ फंड योजनेत आम्ही 50 हजार कोटींची तरतूद केली आहे. जे उद्योगांचा जीएसटी रेकॉर्ड चांगला, आयकराच्या दृष्टीने जे उद्योग योग्य आहे.अशा उद्योगांना MSME स्टॉक अक्सेचेंजचा फायदा होईल. यासाठी 15 टक्के इक्विटी शासन देणार आहे. या उद्योगांना भागभांडवल उभारणीस मदत होईल. स्टॉक एक्स्चेंजमुळे एमएसएमईत परकीय गुंतवणूकही येईल. फूड उद्योगात या क्षेत्रातील उद्योजकांनी नवीन उत्पादने कशी येतील याचा विचार करावा. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ शोध, परीक्षण, निर्मिती करावी,लागेल . यानंतर स्थलांतरित मजुरांवर विसंबून राहता येणार नाही. या उद्योगातील कामगारांना कौशल्याचे प्रशिक्षण देऊन तयार करावे लागेल. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या व्यवसायातील रोजगारा साठी स्थानिक कौशल्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही गडकरी म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार