सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फॉर्च्युन फाऊंडेशनने आता स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे : ना. नितीन गडकरी

फॉर्च्युन फाऊंडेशनने आता स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे : ना. नितीन गडकरी युथ एम्पॉवरमेंट समीट 2021चे उद्घाटन

Snehal Joshi .
  • Mar 13 2021 7:44PM
फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे विदर्भातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहे. मात्र आता ज्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध आहे, अशा क्षेत्राचा अभ्यास करून कौशल्य विकास करून रोजगार कसा निर्माण होईल याचा आपण प्रयत्न करीत आहोत. फॉर्च्युन फाऊंडेशननेही आता स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे सातव्या युथ एम्पॉवरमेंट समीट 2021 चे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमाचे संयोजक माजी आ. प्रा. अनिल सोले, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आ. सुधाकर देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते. ना. गडकरी यांनी यावेळी म्हणाले- स्वातंत्र्यानंतर सुराज्य निर्माण करण्याचा विचार ज्या महापुरुषांनी दिला त्या दिशेनेच आमचे प्रयत्न आहे. सुराज्य म्हणजेच रामराज्य आणि रामराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली शिवशाही. अशा राज्यात गरिबांचे कल्याण व्हावे, त्यांना न्याय मिळावा, बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळावे, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा देणारे राज्य म्हणजेच रामराज्य होय.
बेरोजगार तरुणांना दृष्टी देण्याचे कार्य फाँर्च्युनतर्फे केले जात आहे. हे कार्य खूप कठीण आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मिहान प्रकल्पात आतापर्यंत 56 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. मेट्रोच्या माध्यमातून 10 हजार तरुणांना रोजगार मिळाला आणि आता ब्रॉडगेज मेट्रोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात 100 कोटींचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प टाटा सुरु करणार आहेत. इले. वाहननिर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. यातूनही हजारो तरुणांना रोजगार मिळेल. नागपूरच्या विकासाचा सर्वांगीण विचार यातून व्हावा. प्रत्येक क्षेत्रात काम करण्यास वाव आहे. सर्वांनी त्या दिशेने काम केले तर नागपूरचा विकास होईल, असेही ते म्हणाले.
फॉर्च्युन फाऊंडेशनने आता खादी ग्रामोद्योग, एमएसएमईच्या योजनांची माहिती घेऊन, हस्तकला, हातमाग उद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार