सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आत्म निर्भय होण्यासाठी स्वकौशल्य आणि परकीय गुंतवणूक आवश्यक.-- गडकरी

केंद्राने आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केलं. आत्म निर्भय भारत करायचा असेल तर सुधारणा, परिवर्तन आणि कृती या माध्यमातून देशाचा विकास संभव आहे.वस्तू निर्मिती वाढवावी लागेल. ही क्षमता आपल्यात आहे. परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करायची पात्रता देखील भारता जवळ आहे.

Snehal Joshi
  • Jun 20 2020 8:18PM
असं म्हटलं जातं की  सुखात साथ सगळेच देतात. पण जो दुःखात साथ देईल तो आपला.  कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आपले कोण आणि परके कोण हे जाणवायला  लागले. व्यक्ती पातळीवर, गाव पातळीवर राज्य तथा देशपातळीवर पण हा फरक स्पष्ट  दिसला. आणि अनेक सामाजिक संघटनांनी जे  स्वदेशीचा स्वप्न पाहिलं होतं. त्याची नितांत गरज कोरोना काळात जाणवू लागली. आणि केंद्राने आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केलं. आत्म निर्भय भारत करायचा असेल तर   सुधारणा, परिवर्तन आणि कृती या माध्यमातून देशाचा विकास संभव आहे.वस्तू निर्मिती वाढवावी लागेल. ही क्षमता आपल्यात आहे. परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करायची पात्रता देखील भारता  जवळ आहे. असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ  वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

रिजनरेतिव्ह इकॉनामिक ट्रान्सफॉर्मेशन वर ई-संवादाच्या माध्यमातून तेबोलत होते.कोनाचा  प्रभावा मुळे अर्थव्यवस्थे वर ही विपरीत परिणाम झाला आहे. संपूर्ण जग हे करोना मुळे संकटात आहे . यात मार्ग काढायचा असेल तर स्वदेशीने आत्मनिर्भर होणे हाच राजमार्ग आहे. आणि सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न 29 टक्के आहे. 48 टक्के निर्यात या विभागाची असून 11 कोटी 
रोजगार या विभागाने निर्माण केले आहे. कृषी ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अतयंत कमी आहे. आज 115 जिल्हे विविध समस्यांचा सामना करीत आहेत. याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, आपल्याकडे कौशल्य असलेले कामगार आहेत. कच्चा माल आहे. बाजारपेठ आहे. उच उच्चशिक्षित व्यवसाय करणारे मनुष्यबळ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा  सगळ्या माल विकण्यासाठी सामान्य ते सामान्य व्यक्तीला मार्केटिंग स्किल शिकवण्याचे कौशल्यही आपण विकसित करतो आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार