सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा-तालुक्यासह जिल्ह्यात बेमोसमी पाऊस सुरू असतांनाही रिमझिम पावसात शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अतिडोंगराळ भागातील पहाडपट्ट्यात असलेल्या नागझिरी, उपलापाणि व कोटबांधणी या आदिवासी पाडयांना भेट

आमदार राजेश पाडवी यांनी अतिडोंगराळ भागातील पहाडपट्ट्यात असलेल्या नागझिरी, उपलापाणि व कोटबांधणी या आदिवासी पाडयांना भेट

Nandurbar MH
  • Dec 14 2020 11:26AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

शहादा-तालुक्यासह जिल्ह्यात बेमोसमी पाऊस सुरू असतांनाही रिमझिम पावसात शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अतिडोंगराळ भागातील पहाडपट्ट्यात असलेल्या नागझिरी, उपलापाणि व कोटबांधणी या आदिवासी पाडयांना भेट देऊन तेथील जनजीवनाच्या समस्या जाणून घेतल्या. या गावांना जाताना अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने बऱ्याच ठिकाणी त्यांना पदयात्रा करावी लागली. आ. पाडवी यांच्या या अचानक भेटीने भारावून जात काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य तथा २० वर्ष सरपंच असलेले शंकर पावरा व उपलापाणीचे कारभारी नोबल्या वळवी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांनी भावना व्यक्त करीत सांगितले की, आमच्या पाड्यांमध्ये वर्षानुवर्षे एकही खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य भेटीला आले नाहीत, त्यामुळे आमच्या समस्या कोणीही दूर करू शकले नाहीत आपण पहिले आमदार आहात या पहाड पट्ट्यात पडत्या पावसात पायी चालत आमच्या भेटीला येऊन आमच्या समस्या जाणुन घेत आणि त्या सोडविण्याचा संकल्प सोडला.

आ. राजेश पाडवी यांनी पहाड पट्ट्यातील समस्या जाणून घेत म्हणाले की, या भागातील वाडे-पाड्या पर्यंत रस्ते तयार करण्यासह विद्युत पुरवठा पोचविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करून येथील ग्रामस्थांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी नविन विंधन विहीरी केल्या जातील. रेशनकार्ड, घरकुल योजना, यासह शासकीय योजना पोहचविण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जातील. वनपट्ट्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल. प्रलंबित असलेले दावे देखील लवकरच निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगून ग्रामस्थांना आश्वस्थ केले. यावेळी सुनिल चव्हाण, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, नारायण ठाकरे, डॉ विजय चौधरी, सुखलाल रावताळे, जगन मोरे, विरसिंग पाडवी गुड्डू वळवी, गोपी पावरा, बाबुलाल पावरा, कांतीलाल पाडवी, गुलाबसिंग भिल, आट्या भिल, दाज्या भिल, रतीलाल भिल, व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार