सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी आमदार धीरज विलासराव देशमुख तर व्हॉईस चेअरमन म्हणून अँड प्रमोद जाधव यांची बिनविरोध निवड

बिनविरोध निवडीचा लातूर पॅटर्न कायम, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड, राज्यातील जिल्हा बँकात तरुण चेअरमन म्हणुन आमदार धीरज देशमुख यांचा समावेश.

S.n.ranjankar
  • Dec 7 2021 1:15PM
राज्यातील अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन चेअरमन पदी आमदार धीरज विलासराव देशमुख तर व्हॉईस चेअरमन म्हणून अँड प्रमोद जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षि दिलीपराव देशमुख पालकमंत्री ना.अमीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या असून त्यामुळे  लातूर बँकेच्या चेअरमन व्हॉईस चेअरमन बिनविरोध निवडीचा लातूर पॅटर्न कायम राखला आहे.दरम्यान सोमवारी सकाळी नऊ वाजता माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी नूतन सर्व संचालक मंडळ यांची बैठक घेण्यात आली त्यात सर्वानुमते आमदार धीरज देशमुख व अँड प्रमोद जाधव यांची अनुक्रमे चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी निवड घोषित करण्यात आली होती त्यानुसार जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली त्यात अध्यक्ष पदासाठी आमदार धीरज देशमुख व उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली दरम्यान आमदार धीरज देशमुख यांच्या निवडीमुळे राज्यातील जिल्हा बँकात सर्वात तरुण चेअरमन म्हणून धीरज देशमुख ठरले आहेत.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत सहकार पॅनल चे उमेदवार बहुमताने निवडून आल्याने नूतन चेअरमन व व्हॉईस चेअरमन कोण होणार याची उत्सुकता वाढली होती माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब  पालकमंत्री ना. अमित देशमुख  यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सर्व संमतीने सन्माननीय सर्व संचालक मंडळ यांच्या सूचनेनुसार दोन्ही निवडी बिनविरोध निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, बँकेचे नूतन चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, आमदार तथा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे मावळते अध्यक्ष बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे, मावळते उपाध्यक्ष बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, एन आर पाटील, संचालक व्यंकटराव बिरादार, संचालक मारुती पांडे, संचालक राजकुमार पाटील, संचालक अनुप शेळके, अशोक गोविंदपूरकर, दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने, भगवानराव पाटील तळेगावकर, श्रीमती लक्ष्मीबाई चंद्रशेखर भोसले, सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, उपस्थित होते.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी कामकाज पाहिले त्यांना सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, महेश सावंत यांनी सहकार्य केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार