सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव व्हावा या उद्देशाने लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव

Sudarshan MH
  • Dec 9 2020 4:36PM
नांदेड दि.9(अरविंद जाधव)
*कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव व्हावा या उद्देशाने लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊन आणि
लॉयन्स  क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने  ५००० मास्क व सॅनिटायझरचे विविध पोलीस स्टेशन, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, वृत्तपत्र कार्यालय तसेच नांदेड शहरातील सर्व चौकामध्ये थांबून वाहनधारकांना मोफत वाटप करण्यात आले.

पूर्व प्रांतपाल लॉ.अ‍ॅड. प्रवीण अग्रवाल यांच्या हस्ते शहर वाहतूक पोलीस स्थानक येथे उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वाहतूक पोलीस  निरीक्षक  चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे,झोन चेअरमन लॉ. योगेश जैस्वाल आणि लॉ. विजय भारतीया , सोशल मीडिया अध्यक्ष राज यादव, पोलीस उपनिरीक्षक पन्हाळकर व आगलावे हे उपस्थित होते.संयोजक धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर  यांनी आपल्या प्रास्ताविकात गोदावरी गंगापूजनाचा कार्यक्रम यावर्षी कोरोना संक्रमणामुळे रद्द करण्यात आल्यामुळे त्याऐवजी  हा उपक्रम घेण्यात येत असून मायेची ऊब या उपक्रमांतर्गत आतापर्यंत चौदाशे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले. उपक्रमासाठी सहकार्य करणारे योगेश जायस्वाल,किरण तोष्णीवाल, वसीम बाबुशेठ, किशोर नोमुलवार यांचा शिरोपाव व नेपाळ इथून आणलेली  मोत्याची माळ देऊन सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल,
मिडटावुनचे अध्यक्ष  लॉ. जुगलकिशोर अग्रवाल ,प्रोजेक्ट चेअरमन लॉ.रमेश रेड्डी यांनी सन्मान केला. पाहुण्यांचे स्वागत लॉ. मनीष माखन,लॉ. सुनील साबू ,लॉ. मुकेश अग्रवाल,लॉ. किशोर पाटणी, लॉ.ओमप्रकाश मानधने,लॉ. प्रेमकुमार फेरवानी, लॉ. चक्रावार यांनी केले. प्रसंगी ॲड. प्रवीण अग्रवाल, जगदीश भंडरवार, योगेश जायस्वाल, जुगलकिशोर अग्रवाल, संजय अग्रवाल यांनी समायोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  लॉ.अमरसिह चव्हाण  तर आभार  राजेशसिंह ठाकूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, राजेश यादव, नरसिंह कहाळेकर, आतमसिंघ पवार, ॲड. रणजित देशमुख, किशोर लोंढे, दिलीप कलवानी, मोहम्मद नजीब सौदागर, राजू मोरे, आशिष स्वामी, पवन यादव, मन्मथ स्वामी यांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार