सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर पॅटर्नच्या धर्तीवर कव्ह्यामध्ये विकासाचा पॅटर्न निर्माण करू-शिवाजीराव पाटील कव्हेकर

शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न गाजलेला आहे. यामध्ये जेएसपीएम शिक्षण संस्थेचेही योगदान मोलाचे आहे. यापुढील कालावधीतही शिक्षणावर लक्ष देवून चौफेर दृष्टीने विचार करून राजकीय क्षेत्रात काम करीत असताना समाजकारणाला महत्त्व देवून लातूर पॅटर्नच्या धर्तीवर काम करून कव्ह्यामध्ये विकासाचा पॅटर्न निर्माण करू, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले

s.ranjankar
  • Jul 6 2021 4:24PM


लातूर: शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न गाजलेला आहे. यामध्ये जेएसपीएम शिक्षण संस्थेचेही योगदान मोलाचे आहे. यापुढील कालावधीतही शिक्षणावर लक्ष देवून  चौफेर दृष्टीने विचार करून राजकीय क्षेत्रात काम करीत असताना समाजकारणाला महत्त्व देवून लातूर पॅटर्नच्या धर्तीवर काम करून  कव्ह्यामध्ये विकासाचा पॅटर्न निर्माण करू, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.यावेळी ते 2 हजार वृक्ष लागवडीच्या मियावॉकी प्रोजक्टच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आय.ए.एस.अधिकारी जतिन रहेमान, उममुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले, सरपंच पद्मीनताई सोदले, उपसरपंच किशोर घार, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, मराठवाडा आवर्षन प्रवण भाग आहे. त्यामुळे यंदाही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पेरण्याही पूर्ण झालेल्या नाहीत. आपल्याकडे 33 टक्के क्षेत्रावर वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे.त्याप्रमाणात वृक्ष लागवड केली जात नाही. परिणामी लातूर जिल्ह्यातील वनक्षेत्र अर्धा टक्क्यावर आलेले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी वृक्ष चळवळ उभी करून वृक्ष लागवडीबरोबर संवर्धनसाठीही पुढे यावे. तसेच मराठवाडा पाणी प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मराठवाडा वाटरग्रिड प्रकल्प माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस व आ.बबनराव लोणीकर यांनी मार्गी लावला आहे. तो सक्रियपणे राबविणे आवश्यक आहे. या माध्यमातून 11 धरणे एकत्र करण्याचा संकल्प आहे. यासाठी 24 हजार कोटींचा खर्च लागणार आहे. परंतु सध्याच्या शासनाने अपेक्षीत आर्थिक तरतूद केली नाही. ती केली पाहिजे. या योजनेतून शेती, उद्योग व पिण्यासाठी पाणी मिळणार आहे.  यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला तर मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला. निसर्गाचा समतोल कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपन करावे - सी.ई.ओ. गोयल सध्या निसर्गाचा समतोल कायम ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये वृक्ष लागवड हाही महत्त्वाचा घटक आहे. एखादा व्यक्‍ती 80 वर्ष जगला तर त्याला तीन झाडांपासून मिळेल एवढा ऑक्सीजन लागतो. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकांनी तीन झाडे लावून त्याचे संवर्धन करावे. आणि निसर्गाचा समतोल कायम ठेवावा तसेच टचांईमुक्‍तीसाठी रेन वॉटर हार्वेस्टींग व शोषखड्डे तयार करून वेस्टेज पाणी एकाच ठिकाणी मुरविण्याचे काम करा. त्यामुळे गावातील पाणी टंचाईचा प्रश्‍न पूर्णपणे मार्गी लागेल. या कामासाठी चळवळ उभी करा.व यामध्ये जे कुटुंब सक्रियपणे सहभाग घेईल. त्याला नळपट्टी व घरपट्टीमध्ये 25 टक्के सुट देवू असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला.100 टक्के लसीकरण पूर्ण करा कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लस दिली जात आहे. आपल्या गावातीलही 80 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 20 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी  व कोरोनामुक्‍तीसाठी पुढे या सध्या जरी लसीचा पुरवठा पुरेसा होत नसला तरी यापुढील कालावधीत तो कोटा पूर्ण करून कव्हा हे गाव 100 टक्के कोरोनामुक्‍त करा, तसेच शिक्षण व कुपोषणावरही कायम लक्ष द्या, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ.अभिनव गोयल यांनी यावेळी बोलताना केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार