सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जातीच्या नावावर बनणारे नेते समाजाचा विकास करत नाहीत - नितीन गडकरी : अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळा

नितीन गडकरी : अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळा

Snehal Joshi. MH
  • Feb 1 2021 6:38AM

 
नागपूर : मला मत द्या किंवा नको द्या, हे तुमचे स्वातंत्र्य. मात्र, मी चुक लक्षात आणून देण्यास मागे राहणार नाही. जातीचे राजकारण मी कधीच केले नाही. आणि करणार नाही. जे नेते जातीच्या नावावर बनतात, ते कधीच समाजाचा विकास करत नाही... असा टोला जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाणला. 
लहू सेनेच्या वतीने शिक्षक सहकारी बँक सभागृहात रविवारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर दयाशंकर तिवारी, माजी आ. अनिल सोले, लहू सेनेचे अध्यक्ष संजय कठाळे, रवी खडसे, किशोर तेलंग, जावेद पठाण उपस्थित होते. याप्रसंगी ‘लोकमत’चे वरिष्ठ पत्रकार नरेश डोंगरे यांच्यासह अशोक भावे, सुनिल वाघमारे, रवींद्र खडसे, डॉ. सुधाकर शिंदे, अशोक कांबळे, चंद्रकांत वानखेडे, दादासाहेब क्षीरसागर, अरविंद डोंगरे, किशोर तेलंग, विलास कठाळे या समाजातील कर्तृत्त्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. 
मागण्या नेत्यांपुढे ठेवताना समाजाच्या विकासाचा रोडमॅप असणे गरजेचे आहे. नोकरी मागीतल्या मिळत नाही तर समाताच्या नेतृत्त्वाकडे समाजातील गुणवान, कर्तृत्त्ववान युवकांची यादी असली पाहिजे. तुम्ही ती यादी तयार करा आणि नोकरी, उद्योगधंद्यांसाठी मदत मागाल तर ती मी देईल, असे खंबीर आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. अण्णाभाऊ साठे हे अवघ्या नागरिकांसाठी प्रेरणा आहेत. मात्र, त्यांच्या शिकवणूकीचा वारसा कोणी चालवितो आहे का, असा सवाल उपस्थित करत शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाची दिशा ठरवा, त्यांना प्रोत्साहन द्या. तरच अनेक कर्तृत्त्ववान व्यक्ती पुढे येतील, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. प्रास्ताविक संजय कठाळे यांनी केले. 
 
*देशातला सगळ्यात मोठ्ठा पुतळा उभारूअण्णाभाऊ साठे यांचे स्मारक नागपुरात साकारले जाईल. त्यादृष्टीने तयारी ठेवा. अण्णाभाऊ साठे यांचा देशात सगळ्यात मोठ्ठा पुतळा नागपुरात उभारू, असे आश्वासन देतानाच अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी आश्वासन दिले.*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार