सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण परिस्थितीची गरज ओळखून काम करा - ऍड अनिल परब

आमदार दिलीप लांडे यांच्यातर्फे मोफत ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ

Sudarshan MH
  • Apr 28 2021 5:40PM

आमदार दिलीप लांडे यांच्यातर्फे मोफत ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ

मुंबई: महाराष्ट्र आज कोरोनाच्या संकटातून जातोय अशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.  सर्व गरजू रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी शिवसेना अहोरात्र प्रयत्न करत आहे.  त्याचाच एक भाग म्हणून आमदार दिलीप लांडे यांनी गरजूंना ऑक्सिजन मिळाला पाहिजे हे सामाजिक भान ठेवून आपल्या चांदीवली विधानसभा क्षेत्रात मोफत ऑक्सिजन वाटप करण्याची व्यवस्था केली आहे.  स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिली की परिस्थितीची गरज ओळखून काम करा त्याप्रमाणे दिलीप लांडे हे आपल्या विभागात काम करत असल्याची प्रतिक्रिया परिवहन व संसदीय कार्यमंत्री ऍड अनिल परब यांनी दिली. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुंबईमधील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन चांदीवलीतील नागरिकांसाठी मोफत ऑक्सिजनची घरपोच व्यवस्था केली आहे. त्याचा शुभारंभ मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान परब पुढे म्हणाले की शिवसेना ही सामाजिक भान ठेऊन कार्य करणारी आहे. कोरोनाच्या  काळात दिलीप लांडे यांचे सतत काम सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांची ही जिद्दच कामी येणार असल्याचे ऍड अनिल परब म्हणाले. 
           मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आमदार दिलीप लांडे यांच्या तर्फे रुग्णांना दिलासा देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेनटेटर सेवा सुरु करण्यात आली. 
गेले दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या आलेल्या लाटेमुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येत मोठ्या भयानक वाढ झाली. परिणामी बेड, रेमडेसिव्हर सारखे औषधे यांचा तुटवडा जाणवत असताना ऑक्सिजनअभावी रुग्णाची मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ऑक्सिजनअभावी दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना आमदार दिलीप लांडे यांनी जर्मन बनावटीचे ५० ऑक्सिजन कॉन्सेनटेटर खरेदी करून गरजू रुग्णांना विनामूल्य सेवा सुरु करण्यात आली. 
                यावेळी ऑक्सिजन कॉन्सेनटेटर वाटप करताना परिवहन मंत्री ऍड अनिल परब, सोबत आमदार दिलीप लांडे, शाखाप्रमुख नितीन गोखले, उपशाखाप्रमुख आशा खेडेकर, संभाजी भोसले, संजय गरुड आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार