सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर खंडणी प्रकरण; सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध खोटी तक्रार देण्यास भाग पाडले, तक्रारकर्त्याचा दावा

लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवराज बावरी यांच्यासह १२ ते १३ जणांचा समावेश असलेल्या कथित खंडणी प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.

Patil
  • Jun 24 2024 6:30PM
लातूर: लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवराज बावरी यांच्यासह १२ ते १३ जणांचा समावेश असलेल्या कथित खंडणी प्रकरणाने नवे वळण घेतले असून, तक्रारकर्त्यांनेच दावा केला आहे की मला "खोटी तक्रार" दाखल करण्यास भाग पाडले गेले. तक्रारदार अंकुश बनसोडे सांगितले, की त्यांनी एका सामाजिक संघटनेकडे या प्रकरणात अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्या आहेत.
 
तक्रारदार अंकुश बनसोडे यांनी एक विडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत तक्रारदार अंकुश बनसोडे यांनी म्हटले आहे, की २२ जून रोजी गांधी चौक पोलीस ठाणे येथे सामाजिक कार्यकर्ते युवराज बावरी व इतर असे एकूण १२ ते १३ जणांविरुद्ध दिलेली तक्रार ही काही इसमांच्या दबावाखाली दिलेली असून या प्रकरणात मी माझी तक्रार माघारी घेत असल्याचे म्हटले आहे. तक्रारदारांनी केलेल्या खुलाश्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय दूर होणार आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा प्रकारच्या प्रकरणात डायरेक्ट गुन्हा दाखल करून कारवाई करू नये, प्रकरणाची सखोल चौकशी करावी तपास लावावा व नंतरच गुन्हे दाखल करावे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार