जिप अध्यक्ष ठाकरे यांचे हस्ते कोवीड लसीकरणाला प्रारंभ
अध्यक्ष ठाकरे यांचे हस्ते कोवीड लसीकरणाला प्रारंभ
दिनांक :16-Jan-2021
मंगरुळनाथ,
येथील ग्रामीण रुग्णालयात 16 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे हस्ते कोवीड लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना यावेळी लस देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी धन्वंतरी पूजन करून फित कापून कोवीड लसीकरणाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग -1 डॉ. एल. एन. चव्हाण यांनी सर्वप्रथम लस घेतली. कोरोना लस ही सुरक्षीत असून, अधिकारी, कर्मचार्यांनी कोणतीही भीती न बाळगता सदर लस घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. चव्हाण यांनी केले.
फोटो
16 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालयात 120 लस उपलब्ध असून 100 लसी देण्याचे उदीष्ट असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. अमजद खान, डॉ. अजमल वहिद, डॉ. ऋचा घुनागे, एस. एस. सोळंके, जावेद अली फारुखी, रमेश आडे, शरद गावंडे, प्रकाश संगत व ईतर कर्मचारी उपस्थित होते. तर लस घेणार्या अधिकारी, कर्मचार्यांचे तालूका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प