सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या - खासदार कृपाल तुमाने

कोविड-19 या आजाराला महामारीचे नाव दिले असले तरी कोरोना बाधितांचा मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. मोठ्या प्रमाणात रूग्ण बरे होत आहेत. यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोरोनापासून बचाव करण्याकरिता काळजी घेणे हाच उपाय आहे,

Snehal Joshi .
  • Aug 9 2020 4:28PM
कोविड-19 या आजाराला महामारीचे नाव दिले असले तरी कोरोना बाधितांचा मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. मोठ्या प्रमाणात रूग्ण बरे होत आहेत. यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोरोनापासून बचाव करण्याकरिता काळजी घेणे हाच उपाय आहे, असे आवाहन मौदा येथे शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत रामटेकचे खासदार श्री कृपाल तुमाने यांनी केले. मौदा येथील आढावा बैठकीत कोरोना काळात तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने राबविलेल्या योजनांचा आढावा खासदार श्री तुमाने यांनी घेतला. सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी तालुक्यातील कोविड रूग्णांची व प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. श्री तुमाने यांनी कोविड क्वारेंटाईन सेंटर (सीसीसी), आरोग्य विभागाची तयारी, डॉक्टरांची व औषधींची उपलब्धता याविषयी माहिती जाणून घेतली. आरोग्य विभागाच्या अडचणी असल्यास त्या प्राधान्यक्रमाने सोडविणार असल्याचे यावेळी खासदार तुमाने यांनी सांगितले. खासदार कृपाल तुमाने म्हणाले, कोरोनाची भिती सर्वांच्या मनात आहे. लोक कोरोना टेस्ट करायला घाबरत नाहीत, मात्र क्वांरटाईन व्हावे लागेल भितीमुळे टेस्ट करीत नाहीत. ऋतूबदल होत असताना सर्दी-खोकला, ताप यासारख्या आजाराची साथ आहे, तो कोरोना नाही ही भिती घालविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. यासोबतच सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे निर्देश दिले. कोविड काळात उद्योगधंद्याची आर्थिक परिस्थिती ढाळासली आहे, यामुळे सरकारकडे येणारा कर कमी झाला आहे. शेती हाच एकमेव व्यवसायावर येत्या काळात अर्थव्यवस्था टिकून राहणार आहे. यामुळे प्रशासनाने शेतीकडे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत खासदार श्री तुमाने म्हणाले, शेतकऱ्यांना कोणतिहगी अडचण होणार नाही यासाठी प्रशासनाने कार्य करावे. सर्व पटवाऱ्यांना गावात पाठवावे. छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर पोलिस व प्रशासनाने सक्तीची कारवाई करू नये, अशा सूचना केल्या. या आढावा बैठवीत आमदार टेकचंद सावरकर, जि.प. सभापती तारकेश्वर वैद्य, जि.प. सदस्य अनिल निधान, योगेश देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख सदूकर हटवार, माजी जिप सदस्य नंदा लोहबरे, मितेश वांगे, सरपंच पोटफोडे, उपसभापती सौ थोटे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य विविध गावांतील सरपंचांसह उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार प्रशांत सांगडे, तालुका आरोग्य अधिकारी नारनवरे, ग्रामीण रूग्णालाचे डॉक्टर सोनसरे, मौदाचे ठाणेदार मधुकर गिते, मौदा नगर पंचायतच्या मुख्याधिकारींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार