सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*भानेगाव रेडझोन परिसरात सडलेल्या धान्याच्या किट्सचा पुरवठा*

रेडझोन परिसरात सावनेर तहसील कार्यालया माध्यमातून अन्न धान्याच्या किट्सचा पुरवठा करण्यात आला मात्र पुरवठा करण्यात आलेल्या किट्स सडलेल्या स्थितीत आढळून आल्यामूळे परिसरातील नागरिक चांगलेच संतापले

Snehal Joshi
  • Jul 10 2020 11:39PM
अलीकडे भानेगाव परिसर कोरोना हॉट स्पाट ठरत आहे आता पर्यत या परिसरात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत भानेगाव परिसरात महावितरण कंपनीचा कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आला त्यामुळे परिसर सिल करून रेडझोन घोषित करण्यात आला जवळपास येथील ४० कुटुंबांना होम क्वारंटाईन करण्यात आले रेडझोन परिसरात सावनेर तहसील कार्यालया माध्यमातून अन्न धान्याच्या किट्सचा पुरवठा करण्यात आला मात्र पुरवठा करण्यात आलेल्या किट्स सडलेल्या स्थितीत आढळून आल्यामूळे परिसरातील नागरिक चांगलेच संतापले असून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व प्रशासना विरुद्ध संतप्त रोष व्यक्त केला आहे. भानेगाव येथिल वार्ड क्रमांक ४ परीसरात ५ जुलै रोजी रायगड वरून आलेला महावितरण कंपनीचा कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला त्यामुळे वार्ड क्रमांक ४ परीसर सिल करून रेड झोन घोषित करण्यात आला येथील जवळपास ४० कुटुंबांना होम कोरेटाईन करण्यात आले वार्ड क्रमांक ४ परिसरात राहणारे अधिकतर नागरिक मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात लॉक डाऊन असल्यामुळे मागील तीन महिन्यापासून हाताला कामधंदा नाही त्यामुळे त्यांच्या घरात अठरा विश्वे दारिद्र लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे कामधंदा सुरू झाला मात्र ५ जुलैला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामूळे त्यांच्या चिंतेत भर पडली शासनाने परिसर रेडझोन घोषित केल्याने घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला प्रशासनाच्या वतीने कोणतीही मदत मिळत नसल्याचे पाहून नागरिकांची ओरड सुरू झाली ८ जुलै रोजी सावनेर तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन अन्न धान्याच्या किट्सचा पुरवठा करण्यात आला सदर किट्स मध्ये 5 किलो तांदूळ 1 किलो चना दाळ तर 5 किलो गव्हाचे पीठ, हळद, मिर्ची पावडर, मीठ, इतर वस्तूचा पुरवठा करण्यात आला मात्र सदर साहित्यात तांदूळ, चना दाळ सडलेल्या स्थितीत आढळून आले डाळ पाण्यात भिजल्यामुळे डाळीचा चेंडू तयार झाला तर काही धान्याला अळ्या लागल्या गव्हाच्या पिठाची बॅगची मिळाली मात्र त्यावर मुदत तसंपलेली तारीख होती सडलेल्या अन्न धान्याच्या किट्सचा पुरवठा झाल्यामुळे भानेगाव वार्ड क्रमांक ४ परिसरात राहणारे माणसेच आहेत जनावरे नाहीत अश्या संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या असून प्रशासना विरुद्ध रोष बघायला मिळाला. वार्ड क्रमांक ४ परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्या मूळे येथील ४० कुटुंबांना जवळपास २८ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे कोरोनामुळे आधीच हाताला कामधंदा नाही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे पुन्हा बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या किट्स कुटुंब संख्येच्या तुलनेत फार कमी आहे त्यामुळे महिनाभर पुरेल इतक्या अन्न धान्याचा पुरवठा शासनाने करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. *बाक्स* *कचऱ्याच्या वाहनातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा* रेडझोन परिसरात अत्यावश्यक सेवा देण्याचे शासनाचे आदेश आहे अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची आहे मात्र पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतांना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कचऱ्याच्या वाहनातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला येथील ग्रामस्थांनी केला आहे शिवाय रेडझोन परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीसाकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला आहे त्यामुळे शासन व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने रेडझोन परिसरात होम क्वारंटाईन असलेल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी अशी आग्रही मागणी येथील नागरिकांनी केली यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी शेंबेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वाहन उपलब्ध नसल्यामुळे सुरुवातीला कचऱ्याच्या वाहनांच्या कॅबिनमध्ये पाण्याच्या कॅन ठेऊन आणण्यात आल्या खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे रेडझोन परिसराची विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले शिवाय धान्याच्या किट्सच्या लवकरच व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले तहसीलदार दीपक करांडे यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार