सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गाय मारली म्हणून केली बिबट्यांची हत्या; 4 आरोपी निष्पन्न

बिबट्यांची हत्या; 4 आरोपी निष्पन्न

Nandurbar MH
  • Dec 23 2020 10:44AM
नंदुरबार - गाय मारली म्हणून त्या दोन्ही बिबट्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. विष प्रयोग करून हे सूडनाट्य घडवले गेले. पकडलेल्या 8 संशयीतांपैकी चार जणांनी हा गुन्हा कबूल केला. त्या चारही आरोपींना आज मंगळवार दिनांक 22 डिसेंबर रोजी न्यायालयातून कोठडी घेण्यात आली. 
सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) धनंजय पवार यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चिंचपाडा वनपरिक्षेत्रात विसरवाडी राखीव वन कक्षातील गडदाणी येथे दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी कुजलेल्या अवस्थेत बिबट वन्यप्राणीचा सांगडा आढळुन आला. पुढील तपास तात्काळ सुरु केला. सदर बिबटचे चारही पाय कापलेले, खालचा जबडा तोडलेला तसेच अर्धवट कातडी काढलेली आढळून आली. सुर्यास्त झाल्याने सदर मृत बिबटचे शवविच्छेदन व अंतीम विधी दि.20 डिसेंबर 2020 रोजी सकाळी करण्यात आले.
पुढील तपासात दि.21 डिसेंबर 2020 रोजी प्रथम घटनास्थळापासून लागून असलेल्या राखीव वनांत अजून एक नर जातीचा बिबट वन्यप्राणी मृत आढळून आला. सदर बिबटचे देखील चारही पंजे कापलेले आढळून आले. सदर बिबटचे शवविच्छेदन व अंतिम विधी करण्यात आला.
वनगुन्हाची नोंद केली. दरम्यान मौजे गडदाणी येथील संयशीत व्यक्तीना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा आरोपी सुरत्या खंड्या गावीत, रा.गडदाणी याने कबुली दिली. त्यांच्या मालकीची गाय बिबट्याने ठार केल्यामुळे सुडबुध्दीने विष प्रयोग केला. त्यात सदर दोन्ही बिबटचा मृत्यु झाला, असे प्राथमिक चौकशीत निष्पन झाले. तसेच सदर गावातील रणजित मोत्या गावीत, यांचे कडे बिबटचा एक दात, विजय नानजी गावीत, यांचे कडे बिबटच्या दोन मिशीचे केस, अशोक धिरजी गावीत, यांचे कडे बिबटचे कापलेले दोन पंजे आढळुन आले. सदर चारही आरोपीना आज रोजी प्रथम वर्ग न्यायालय, नंदुरबार येथे हजर करण्यात आले. चारही आरोपीना दि.24 डिसेंबर 2020 पर्यत वन कोठडी न्यायालय मार्फत सुनावण्यात आलेली आहे.पुढील तपास सहा.वनसंरक्षक(प्रा व वन्यजीव) नंदुरबार वनविभाग नंदुरबार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा (प्रा), वनक्षेत्रपाल गस्ती पथक, नंदुरबार व क्षेत्रीय कर्मचारी म.मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) धुळे, म.उपवनसंरक्षक, नंदुरबार वनविभाग, म.विभागीय वनअधिकारी(दक्षता) धुळे यांचे मार्गदर्शन खाली करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार