सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कारगिल विजय दिन - 26 जुलै

संशोधन प्रकल्पाचे नाव होते "इंडिया - अ स्टडी इन प्रोफाइल". या अभ्यासानुसार, पाकिस्तान सैन्याचे असे मत होते की भारताच्या आपल्या समस्या आहेत आणि त्या समस्यांचा फायदा घेत भारताच्या मोठ्या आणि शक्तिशाली सैन्यावर नियंत्रण मिळवता येईल. हा अभ्यास 1990 मध्ये प्रसिद्ध झाला होता, पण पाकिस्तानी सैन्याची मनस्थिती पूर्वीपासून वेगळी नव्हती.

भाषांतर - वीरेंद्र देवघरे
  • Jul 26 2020 2:41PM
जम्मू-काश्मीर भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुच्छेदात 15 व्या क्रमांकावर आहे. सांस्कृतिकदृष्ट्या जम्मू-काश्मीर हा शतकानुशतके भारताचा एक भाग राहले आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारत बर्‍याच काळापासून इंग्रजांचा गुलाम होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी आम्ही स्वतंत्र झालो, इंग्रजांनी आर्थिक आणि सांस्कृतिक दोन्ही पातळीवर भारताचे शोषण केले. या दोहन आणि शोषणाचा हा काळ सुमारे दीडशे वर्षे चालला. शेवटी 1947 मध्ये इंग्रज भारतातून गेले पण जाता-२ त्यांनी ब्रिटीश भारताचे विभाजन केले. अस्तित्वात आला नवीन डोमिनियन पाकिस्तान. फाळणी ब्रिटीश भारताची झाली होती, पण देशी रियासतींना असा हक्क देण्यात आला होता की ते भारत किंवा पाकिस्तान पैकी कोणत्याही एका देशात जाऊ शकतात. देशी रियासती कोणत्या डोमिनियनचा भाग बनतील याचा आधिकार पक्त आणि फक्त त्या रियासतचे राजे किंवा नवाब यांना देण्यात आले होते. आपल्या याच अधिकाराचा प्रयोग करुन जम्मू-काश्मीरच्या महाराज हरीसिंग यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू-काश्मीरचे भारतात विलय केले होते, ज्याला माउंटबॅटनने 27 ऑक्टोबर 1947 रोजी स्वीकारले होते. पाकिस्तान अस्तित्त्वात आल्यानंतर या आशेवर होता की जम्मू-काश्मीर पाकिस्तानात येईल. पण पाकिस्तानचे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले. जेव्हा पाकिस्तानला असे वाटले की महाराज हरि सिंह जम्मू-काश्मीरचे विलय भारतामध्ये करतील, तेव्हा त्याने 22 ऑक्टोबर 1947 ला जम्मू-काश्मीरवर पहिले आक्रमक केले. जम्मू-काश्मीरचे भारतात विलय झाल्यानंतर, जेव्हा भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले, तो पर्यंत राज्याचा एक मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. भारतीय सैन्याने राज्याच्या बऱ्याच भागातून पाकिस्तानी लष्कराला हुसकावून लावले. तेव्हा ब्रिटीशांच्या षडयंत्रामुळे 31 डिसेंबर 1947 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पाकिस्तानच्या हल्ल्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्र संघात घेऊन गेले. नेहरू तिथे आंतरराष्ट्रीय शक्तींच्या भ्रमजाळात अडकले. याचाच परिणाम म्हणून आज जम्मू-काश्मीरचा एक मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला, ज्याला आपण अधिकृत जम्मू-काश्मीरच्या नावाने ओळखतो. मीरपूर, भीमबर, कोतली, बाग, मुझफ्फराबाद, गिलगित आणि बाल्टिस्तान इत्यादी भाग पाकिस्तान अधिकृत जम्मू-काश्मीरमध्ये येतात. पाकिस्तानी लष्कराच्या चुकीच्या धारणा आणि त्याचे दुष्परिणाम जावेद अब्बास हे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी होते. जेव्हा ते ऑफिसर कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये लेफ्टनंट कर्नलच्या पदावर होते तेव्हा त्यांना संशोधनचे एक काम सोपविण्यात आले होते ज्याला त्यांनी तीन वर्षांत पूर्ण केले होते. संशोधन प्रकल्पाचे नाव होते "इंडिया - अ स्टडी इन प्रोफाइल". या अभ्यासानुसार, पाकिस्तान सैन्याचे असे मत होते की भारताच्या आपल्या समस्या आहेत आणि त्या समस्यांचा फायदा घेत भारताच्या मोठ्या आणि शक्तिशाली सैन्यावर नियंत्रण मिळवता येईल. हा अभ्यास 1990 मध्ये प्रसिद्ध झाला होता, पण पाकिस्तानी सैन्याची मनस्थिती पूर्वीपासून वेगळी नव्हती. 1947 च्या नंतर पाकिस्तान आणि विशेषत: पाकिस्तानचे सैन्य जम्मू-काश्मीरला आपले अपूर्ण राहिलेले काम मानत राहिला आहे आणि भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये काही न काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. अयूब खान पाकिस्तानी सैन्याचा पहिला सेनापती होता ज्याने इस्कंदर मिर्झाला सत्तेतून बाहेर काढून पाकिस्तानवर कब्जा केला होता. अय्यूब खान भारतातील लोकांना रोगग्रस्त समजत होता. त्यांचा विचार असा होता की भारत इतका कमकुवत आहे, भारतीयांचे मनोबल इतके कमकुवत आहे की त्यांना जोरदार वार सहन करता येणार नाही आणि ते विखुरले जातील. या गैरसमजाचा बळी ठरल्यानंतर अय्यूब खानने भारतावर हल्ला केला होता. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी अय्यूब खानला आश्वासन दिले होते की भारत आंतरराष्ट्रीय सीमेवर हल्ला करणार नाही. अय्यूब खान आणि त्यांची पाकिस्तानी सैन्य इतक्या गफलतीत होते की 3 सप्टेंबर 1947 ला जेव्हा भारतीय सैन्य लाहोरच्या बाहेरील भागात पोहचले होते तेव्हा पाकिस्तानी लष्कराचे जवान सकाळी नित्याचा व्यायाम करीत होते. भारताच्या उलट कारवाईमुळे अयुब खान इतका घाबरला होता की त्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत अय्यूब खान म्हणाले - " 5 दशलक्ष काश्मिरींसाठी पाकिस्तान आपल्या १०० दशलक्ष लोकांना कधीही धोक्यात घालणार नाही." “या पराभवानंतर अय्यूब खान कधीही आपली प्रतिमा सुधारू शकला नाही." ज्या गैरसमजांचा बळी अय्यूब खान होता त्याच गैरसमजांचा बळी याहया खान देखील होता. 1971 मध्ये एका ज्योतिषाने याहया खानला सांगितले होते की ते येणाऱ्या 10 वर्षांपर्यंत पाकिस्तानचे प्रमुख म्हणून कायम राहतील. हे ऐकून याहया खान खूप खूष होता, पण तो या गोष्टीपासून अनभिज्ञ होता की दहा वर्ष तर सोडा त्यांना येणाऱ्या दहा दिवसांत आपल्या पदावरून काढून टाकले जाईल. स्वप्रशंसेत याहया खान आणि त्याची टीम इतकी बुडाली होती की जेव्हा त्यांना विचारले गेले की भारताशी कसा सामना कराल तेव्हा त्यांचे उत्तर होते- "मुस्लिम युवकांच्या ऐतिहासिक उच्चतेच्या बळावर" हे उत्तर त्या तत्वहीन राष्ट्रपतींचे होते ज्याला जेव्हा हे कळले की भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला आहे, तेव्हा त्याचे उत्तर होते- "पूर्व पाकिस्तानसाठी मी काय करू शकतो?" मी फक्त प्रार्थना करू शकतो " सत्तेच्या नशेत लिप्त या पाकिस्तानी लष्कराची पातळी पहा की, पाकिस्तानच्या नौदल प्रमुखांना पाकिस्तानवर हवाई हल्ल्याची माहिती पाकिस्तानी रेडिओवरू मिळाली जेव्हा ते सकाळी आपल्या कामासाठी आपल्या कारनी निघाले होते. लेफ्टनंट जनरल ए के नियाझी यांना एअर स्ट्राइक्सबद्दल माहिती बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ऐकत असताना कळली होती. जसे अयूब खान यांनी काश्मिरींना धुतकारले होते, तसेच याहया खान म्हणाला होता की- "ते बंगालींयांसाठी पश्चिम पाकिस्तानला धोक्यात नाही टाकू शकत ". कारगिल युद्ध - पाकिस्तानी सैन्याच्या मेंदूतील कल्पना 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानचा अहंकार छिन्न भिन्न झाला पण पाकिस्तानी सैन्याच्या दुषित मानसिकतेमध्ये परिवर्तन नाही झाले होते. 1999 मध्ये कारगिलच्या अगोदरही कारगिलकडून दोन वेळा भारतावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती आणि पाकिस्तानातील राजकीय नेत्यांसमोर संपूर्ण योजनेची रूपरेषा मांडली गेली होती, पण दोन्ही वेळा ही योजना नाकारण्यात आली होती. एकदा झिया उल हकच्या वेळी. आणि दुसऱ्यांदा बेनझीर भुट्टोच्या काळात. भुट्टो यांच्यासमोर जेव्हा ही योजना ठेवली गेली, तेव्हा पाकिस्तान सैन्याचे डीजीएमओ होते परवेझ मुशर्रफ, हा तोच व्यक्ती होता जो कारगिलच्या काळात पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख होता. . कारगिल युद्धासाठी जबाबदार चार जण होते- दोनदा कारगिलची योजना थांबविण्यात आली होती, पण 1999 मध्ये जेव्हा कारगिलवर दुसऱ्यांदा हल्ला करण्याची योजना आखली गेली तेव्हा परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख होते. मुशर्रफ यांच्याशिवाय लेफ्टनंट जनरल जनरल मोहम्मद अजीज खान, लेफ्टनंट जनरल महमूद खान आणि मेजर जनरल जावेद हसन. . या चोघांच्या व्यतिरिक्त लेफ्टनंट कर्नल जावेद अब्बास देखील कारगिल युद्धाला जबाबदार आहेत, ज्यांचा अभ्यास भारत - अ स्टडी इन प्रोफाइल वर परवेझ मुशर्रफ फार प्रभावित होता, त्याला वाटत होते की तो भारतावर हमला करेल आणि भारत विखुरल्या जाईल. . पाकिस्तानचे सैन्य या भ्रमात होते की तो देखील आता भारता सारखे परमाणु शक्ती आहे आणि या दबावाखाली भारत परतुन हमला नाही करणार. पण 1965 आणि 1971 प्रमाणे पाकिस्तानचे आकलन 1999 मध्ये पूर्णपणे चुकीचे ठरले. पाकिस्तानी हल्ल्याचा उद्देश कारगिलवर पाकिस्तानी हल्ल्याची मुख्य उद्दीष्टे खालील प्रमाणे होती . राष्ट्रीय महामार्ग एकचा पुरवठा बंद करणे. हा महामार्ग श्रीनगरला लेहशी जोडतो. . पाकिस्तानी लोकांना वाटत होते हा पुरवठा बंद पडल्यामुळे भारतीय सैन्य ताबडतोब कोणत्याही प्रकारचा परतुन हल्ला करू शकणार नाही . पाकिस्तानीनां वाटत होते की भारतात इतकी क्षमता नाही आहे की ते पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या जागेवरून हटवू शकेल. . या व्यतिरिक्त असेही म्हटले जाते की, कारगिल हल्ल्यातील वृहद् पक्ष, एक दुसरा पैलू पण होता जो राज्याचा सर्वात छोटा भाग काश्मीरशी जोडलेला होता, ज्याचा खुलासा आजपर्यंत होऊ शकला नाही कारण कारगिल हल्ल्यानंतर भारतीय सैन्य इतके जबरदस्त प्रत्युत्तर देईल याची कल्पना पाकिस्तानी सैन्य अधिकाराऱ्यांना नव्हती. . या वृहद् पक्षानुसार अफगाणिस्तानातील तालिबान प्रमुख मुल्ला मेहसूद रब्बानी यांच्याकडून काश्मिरमध्ये जिहाद लढण्यासाठी पाकिस्तानने 20 ते 30 हजार युवकांची मागणी केली होती. रब्बानी ने 50 हजार युवकांचे वचन दिले होते. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी या प्रस्तावावर खूप खुष झाले. . कारगिलबद्दल परवेझ मुशर्रफ बैचेन होते. 1965 च्या युद्धाच्या आधी कारगिलच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्य होते, सुरक्षा आणि सामरिक दृष्ट्यानी महत्त्वाच्या ठिकाणी होते. पण 1965 आणि 1971 च्या युद्धामध्ये भारताने ते महत्त्वपूर्ण शिखरे आपल्या ताब्यात घेतली होती. मुशर्रफ यांना ती शिखरे परत घ्यायची इच्छा होती. . काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवणे ज्याच्यमुळे अण्वस्त्र युद्धाची शक्यता आहे आणि ज्यामध्ये तीसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची तातडीने आवश्यकता आहे. . नियंत्रण रेषेचे पावित्र्य भंग करून कारगिलच्या अनियंत्रित क्षेत्रांना कब्जात घेणे. भारताची प्रतिउत्तराची कारवाई पाकिस्तानला भारताच्या प्रतिउत्तराच्या कारवाईचा अंदाज बिलकुलच नव्हता. परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या पराभवाची कबुली देताना म्हटले होते की, “भारताने फक्त सैन्याद्वारेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणाने देखील पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले.” Pakistan was clueless about India’s capability to retaliate. At one point Musharaf conceded and said that India retorted not only through military action but also through the international diplomacy. . कारगिल हल्ल्यानंतर थोड्या काळासाठी भारतीय राजकीय नेतृत्व आणि सैन्य दोन्ही थोडे असमंजसात राहिले पण त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी हल्ल्याचा ठामपणे प्रतिउत्तर दिले. एक-२ करून कारगिलची शिखरे रिकामी केली जाऊ लागली. . 13 जून 1999 रोजी तोलोलिंग शिखराला भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या कब्जातून सोडविले, ज्यामुळे पुढच्या युद्धामध्ये त्यांना बरीच मदत मिळाली. लवकरच 20 जून 1999 रोजी प्वांइट 5140 पण त्यांच्या कब्जात आल्यामळे तोलोलिंगवर त्यांचा विजय अभिमान पूर्ण झाला. चार जुलैला आणखी एक नेत्रदीपक विजय नोंदविला गेला, जेव्हा टायगर हिलला घुसखोरांपासून मुक्त केले गेले. पाकिस्तानी घुसखोरांना तेथून हुसकावणे चालू ठेवत भारतीय सैन्य पुढे सरकत राहिले. बटालिकच्या प्रमुख शिख्यांपासून पाकिस्तानी सैन्याला पळवून त्यांना पुन्हा भारताच्या कब्जात आणले गेले. . भारताच्या 14 रेजिमेंट्सने शक्तिशाली बोफोर्सनी कारगिलमध्ये घुसखोरी करून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. भारताच्या नियंत्रण रेषेच्या आत भारतीय वायुसेनेच्या विमानाने पण हल्ले सुरू केले. . पाकिस्तान आपल्या वायुसेनाचा प्रयोग नाही करू शकला कारण पाकिस्तान जगासमोर खोटे बोलला होता की कारगिलमध्ये काश्मिरी मुजाहिद्दीन त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. जर पाकिस्तानने आपल्या वायुसेनेचा उपयोग केला असता तर संपूर्ण जगासमोर त्याचे खोटारडेपणा पकडले जाते. . पाकिस्तानने खूप मोठ्या संख्येत आपले अनेक सैनिक गमावले. पाकिस्तानची नॉर्दन लाइट इन्फंट्री पूर्णपणे नष्ट झाली होती. . कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव राहिलेले शमशाद अहमद खान कारगिल युद्धाबद्दल म्हणाले की, जगातील कोणत्याही परराष्ट्र विभागासाठी अशी वेळ सर्वात वाईट असते. आम्ही आमची कामे पूर्ण क्षमतेने केली, परंतु संपूर्ण जगाने आम्हाला या युद्धासाठी दोषी घोषित केले होते. संपूर्ण जगाचा दबाव आमच्यावर होता. त्यांनी आम्हाला रणांगणातून माघार घेण्यास सांगितले आणि आमच्या राजकीय नेतृत्वाने माघार घेण्याचा योग्य निर्णय घेतला " . पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) अली कुली खान यांनी कारगिल युद्धातील पराभवाला पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात वाईट पराभव घोषित केले होते ज्यात असंख्य निष्पाप लोक मारले गेले होते. . कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्यातील पण अनेक सत्ये समोर आले, ज्यात एक मोठा खुलासा झाला की, मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी व्यसनाधीन झाले आहेत. कारगिल युद्ध - प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानची किरकिरी . कारगिल युद्धाने पाकिस्तानला एक राष्ट्र म्हणून पूर्णपणे उघडकीस आणले होते. तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान आणि सेनाप्रमुख दोघेही एकमेकांवर आरोप करत राहिले. नवाज शरीफ यांची भूमिका अशी आहे की कारगिल हल्ल्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हते, तर दुसरीकडे मुशर्रफ यांचे म्हणणे आहे की नवाझ शरीफ यांना सर्व काही माहित होते. आता नवाज शरीफ यांना माहित होते की नाही हे दोन्हीही बाबतीत पाकिस्तानची किरकिरी होत आहे. जर पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाझ शरीफ यांना या हल्ल्याबद्दल माहिती नसते तर ते अधिक पक्के झाले होते की "पाकिस्तानकडे सैन्य नाही आहे तर सैन्याकडे पाकिस्तान आहे". . तत्कालीन पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचे म्हणणे आहे की देशाचे परराष्ट्रमंत्री असूनही त्यांना 17 मे च्या सकाळी कारगिल हल्ल्याची माहिती मिळाली आणि त्यांना कधीही या स्थितीचे डिप्लोमेटिक स्तरावर काय परिणाम होतील या बाबतीत कधीच नाही विचारले गेले. . पाकिस्तानी सैन्यात इतका गोंधळ उडाला होता की पाकिस्तानचे तत्कालीन अ‍ॅडमिरल फैसलुद्दीन बुखारी यांनी मुशर्रफ यांना थेट विचारले होते की मला या ऑपरेशनबद्दल काहीच कल्पना नाही आहे पण मी विचारतो की एवढ्या मोठ्या मोबिलाइजेशचे क्या उद्देश्य आहे? आपल्याला एका ओसाड जागेसाठी युद्ध करण्याचे मनात आहे ज्याला आपल्याला तसेही हिवाळ्यात रिकामे करावे लागेल. मुशर्रफ यांच्याकडे या पश्नाचे कोणतेच उत्तर नव्हते. . संपूर्ण जगासह पाकिस्तानचा सोबती चीनने पण पाकिस्तानला कारगिलच्या शिखरावरुन आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. सुरुवातीला पाकिस्तान सतत असे म्हणत होते की कारगिलच्या डोंगरावर मुजाहिद्दीन लढत आहेत, पण जागतिक दबावाखाली जेव्हा पाकिस्तानला आपले सैन्यला परत बोलवावे लागले तेव्हा पाकिस्तान सर्व जगासमोर खोटा ठरला की पाकिस्तान मुजाहिदीनीनवर नियंत्रण ठेवू शकतो. यामुळे संपूर्ण जगात एक गोष्ट स्पष्ट झाली की पाकिस्तान काश्मीरमध्ये मुजाहिदीनीनच्या नावाखाली दहशत पसरवत आहे. . परवेझ मुशर्रफ कारगिलला आपले सैनिक विजय मानतो, पण सत्य हे आहे की पाकिस्तानने आपल्या सैनिकांना कारगिलच्या उंचीवर मरण्यासाठी सोडून दिले होते. अनेक जवानांच्या शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की त्यांच्या पोटात गवत होते, म्हणजेच सैनिकांना खायला काहीच नव्हते. . परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की सैन्याने जे मिळवले ते आम्ही डिप्लोमेसीमध्ये गमावले. पण दुसरीकडे नवाज यांनी एका मुलाखतीत म्हटले की जेव्हा मी अमेरिके जवळ मदत मागायला गेलो आणि अमेरिका मदत करण्यास तयार झाला तोपर्यंत भारतीय सैन्याने कारगिलमधून जवळपास सर्वच जागेवरून पाकिस्तानांना बाहेर काढून चुकले होते आणि वेगाने पुढे जात होते अश्या वेळी मी पाकिस्तानी सैन्याचा सनमान वाचविला. . मुशर्रफ यांचे म्हणणे आहे की त्यांनी नवाजला नाही सांगितले की त्यांनी अमेरिकेशी बोलणी करावी. पण दुसरीकडे, नवाज म्हणाले की, जेव्हा ते अमेरिकेत जात होते तेव्हा मुशर्रफ त्याला विमानतळावर सोडण्यासाठी आले आणि त्यांनी अमेरिकेशी बोलण्यास सांगितले जेणेकरुन पाकिस्तानी सैन्यतील जवान कारगिलच्या शिखरावरुन सुरक्षित पणे निघू शकतील, जिथे आता भारतीय सैन्य पुढे सरकत आहे. . पाकिस्तान जेव्हापासून अस्तित्वात आला, तेव्हापासून तिथे कोणत्याही प्रकारचे उत्तरदायित्व निश्चित केले जात नव्हते. ज्या सैन्यप्रमुखने एवढी मोठी चूक केली, तो पाकिस्तानचा राष्ट्रपती बनला आणि एक सैन्य अधिकारी ज्याच्या नेतृत्वात ही लढाई लढली गेली त्याला पदोन्नती मिळाली .. . एकंदरीत असे म्हणता येईल की पाकिस्तान ‘फैनेटिक फोर’ (चार सैन्याचे अधिकारी ज्यांनी कारगिल योजना तयार केली होती) यांच्या फैंटसीचा बळी ठरला आणि अशा प्रकारे एका अयशस्वी देशाच्या लबाडीचा प्रयत्न अपयशी ठरला. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार