सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याने आज नंदुरबार जिल्ह्याशी रक्ताचे नाते जोडले आहे. आमच्या जिल्ह्यातील रक्त आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील रोग्याचे प्राण वाचविण्यासाठी चालले आहे

नंदुरबार जिल्ह्यातील रोग्याचे प्राण वाचविण्यासाठी चालले आहे

Sudarshan MH
  • Dec 19 2020 11:45AM

सुदर्शन न्यूज केतन रघुवंशी 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याने आज नंदुरबार जिल्ह्याशी रक्ताचे नाते जोडले आहे. आमच्या जिल्ह्यातील रक्त आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील रोग्याचे प्राण वाचविण्यासाठी चालले आहे. याचा मला अभिमान वाटत आहे. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला समाजकार्याचा वसा आपण सर्वजण या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जपत आहात, हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकारातून कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मारुती निवास, नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट या ठिकाणी मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेस्त्री, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नजीरभाई शेख, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधानगरी तालुकाध्यक्ष किसन चौगुले, कणकवलीचे पक्ष निरीक्षक सावळाराम अणावकर, सुंदर पारकर, डॉ .अभिनंदन मालंडकर, मंगेश दळवी, सागर वारंग, निसार शेख, संदेश मयेकर, विष्णु पिळणकर आदी उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले , शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानातून कोकणातही कृषी क्रांती घडली आहे. आज त्यांच्या प्रेरणेतून याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेले रक्तदान शिबीर निश्चितच राज्यातील गरजू लोकांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार