सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ज्योतिरादित्य शिंदे यांची हेडगेवार स्मारकाला भेट

काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  रेशीमबाग परिसराला  भेट दिली.

Snehal Joshi .
  • Aug 27 2020 10:14PM
काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  रेशीमबाग परिसराला  भेट दिली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.  सर्वात आधी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक  सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर ते रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी समाधीस्थानाचे दर्शन घेतले. डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान राष्ट्रासाठी समर्पणाची प्रेरणा देणारे  स्थान आहे.  त्यामुळे येथे नमन करायला आलो आहे, काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर मी बोलणार नाही तो काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे असे मत ज्योतिरादित्य शिंदे  यांनी यावेळी व्यक्त केले.  

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार