सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*कोरोना लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण*

आता जम्बो मोहीम : तीन लाख नागरिकांना डोस देण्याचे टार्गेट

Sudarshan MH
  • Apr 3 2021 3:12PM
 
संभाजीनगर : मागील अडीच महिन्यांच्या कालावधीत औरंगाबाद महापालिकेने शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा गुरूवारी दि.2 पूर्ण केला. आता आगामी काळात तीन लाख नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्याचे टार्गेट पालिका प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी जम्बो मोहीम राबवण्याची तयारी देखील पालिकेले केली आहे.
केंद्र सरकारने वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या लसींना मंजुरी देत देशात कोरोनाचे लसीकरण सुरू केले आहे. 16 जानेवारीपासून औरंगाबाद शहरातही या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. मात्र लसीकरणासाठी केंद्र सरकारने टप्पे निश्चित करून दिल्याने, त्यातच नोंदणीच्या किचकट प्रक्रियेमुळे या मोहिमेला मागील अडीच महिन्यांच्या काळात म्हणावी तशी गती मिळाली नाही. पहिल्या टप्प्यासाठी 24 हजार जणांची नोंदणी झाल्यानंतर आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स यांना लस देण्यात आली. 
दुसर्‍या टप्प्यात कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम करणार्‍या फ्रंटलाईन वर्कर्स लस देण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठीही 10 ते 12 हजार जणांनी नोंदणी केली होती. आता एक मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील आजारी व्यक्तींना लस देण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दोन टप्प्याचे लसीकरण सुरू असताना कोरोना संसर्ग कमी झाला होता. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 पेक्षा खाली आली होती. त्यामुळे अनेकांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केले. मात्र आता संसर्ग वाढत असल्याने लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
 
आता लसीकरणाला वेग : शासन निर्देशानुसार आता 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वच व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. त्यामुळे लसीकरणालाही वेग आला आहे. दरम्यान, मागील अडीच महिन्यात शहरात लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे. गुरुवारपर्यंत शहरात 1 लाख 378 जणांना लसीकरण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार