नंदुरबार- दिनांक १४ डिसेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत नंदुरबार नगर पालिकेसमोर कुत्र्याचा चावा घेतल्याने मृत पावलेल्या व्यक्तींचा मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी सहा दिवस अन्नत्याग आमरण उपोषण करूनही नगर पालिकेकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने दि. ३० डिसेंबर बुधवार रोजी दुपारी २:३० वाजता नंदुरबार नगर पालिकेवर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच मागण्या मान्य होण्यासाठी नगर पालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने न्याय मागण्यांसाठी या मूक मोर्चात तसेच ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन हिंदु सेवा साहाय्य समितीकडून करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नेहरू नगरमध्ये राहणारी सहा वर्षीय बालिका हिताक्षी माळी हिचा मोकाट कुत्र्यांने चावा घेतल्याने मृत्यूमुखी पडली त्याचप्रमाणे सहा महिन्यांपूर्वी गाडी समोर कुत्रे आडवे आल्याने अपघात होऊन बलराज राजपूत याचा मृत्यू झाला होता. यांचा मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, मोकाट कुत्रे हिंसक बनण्याचे कारण उघड्यावरील मांस विक्री आणि चिकन मटणाचे पदार्थ बनवून विकणाऱ्या गाड्या यांच्यावर कठोर कारवाई करून बंद करण्यात याव्या, मृतांच्या नातेवाईकांना ठेकेदाराकडून हानिभारपाई मिळवून द्यावी अश्या सहा मागण्यांसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, मृत बलराज राजपूतचे भाऊ मोहित राजपूत यांनी १४ ते १९ डिसेंबर पर्यंत नंदुरबार नगर पालिकेसमोर अन्न त्याग आमरण उपोषण केले.नगर पालिकेने दिलेले लेखी उत्तराने समाधान न झाले नाही. सहा दिवस उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने अखेर नंदुरबार नगर पालिकेवर मूक मोर्चा आणि मोर्चानंतर मागण्या मान्य होण्यासाठी ठिय्या आंदोलन दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजता करण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात छ. शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथुन सुरुवात होऊन पुढे मोठा मारुती मंदिर, दादा गणपती रोड, काका गणपती, देसाईपुरा, सिद्धिविनायक चौक, मंगळ बाजार, नेताजी सुभाषबाबू पुतळा, पप्पूभैय्या हॉटेल, जुनी नगर पालिकेवरून नगर पालिकेवर ठिय्या आंदोलन करून समाप्त होईल.तरी नंदनगरीवासीयांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन धर्मसेवक नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, मृत बलराजचे भाऊ मोहित राजपूत यांनी केले आहे
विनीत
नरेंद्र पाटील मयुर चौधरी मुकेश माळी मोहित राजपूत