सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*साखर कारखान्यांनी इथेनॉलची अधिक निर्मिती करावी-- गडकरी*

साखर कारखान्यांच्या माध्यमातून इथेनॉलची अर्थव्यवस्था एक लाख कोटी पर्यंत देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या जनसंवाद रॅलीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी संबोधित करीत होते.

Snehal Joshi
  • Jun 26 2020 10:00PM
पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहे. साखर निर्मितीत पश्चिम महाराष्ट्राचे योगदान अधिक आहे. साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीने ऊस उत्पादक शेतकरी समृद्ध होणार असल्यामुळे या भागातील साखर कारखान्यांनी साखरेची कमी आणि इथेनॉलची निर्मिती अधिक करावी. साखर कारखान्यांच्या माध्यमातून इथेनॉलची अर्थव्यवस्था एक लाख कोटी पर्यंत देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एम. एस.एम. ई. मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यात कारखानदारांना केले. भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या जनसंवाद रॅलीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते संबोधित करीत होते. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रा च्या कोल्हापूर येथील व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नागपूर शहरात गडकरीं समवेत जनसंवाद रॅलीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे खासदार विकास महात्मे व माजी खासदार अजय संचेती उपस्थित होते. गेल्या सहा वर्षात साखर कारखान्यांचे रक्षण करणारे फक्त नरेंद्र मोदी सरकार असल्याचे सांगताना नितीन गडकरी म्हणाले, की साखर निर्यातीवर 6 हजार कोटीचे अनुदान हे सरकार देत आहे. आज आपल्या देशात तांदूळ, गहू आणि साखरेचा पुरेसा साठा आहे. तांदळापासून इथेनॉल निर्मितीलाही सरकारने परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी इथेनॉल कडे वळले पाहिजे. असे ते म्हणाले. रस्त्याच्या कामाबद्दल सांगताना ते म्हणाले वर्धा, तुळजापूर हा रस्ता पूर्ण झाला. तसेच पुणे, सातारा व सातारा, कोल्हापूर हे कामही लवकर पूर्ण होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे 70 टक्के भूसंपादन झाले आहे. 90 टक्के भूसंपादन झाले की काम सुरू करू. 3 हजार कोटीचा हा मार्ग आहे. त्याच प्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी मार्ग सुरू होत आहे. एकूण 8 हजार कोटीचे हे दोन्ही मार्ग आहेत. या मार्गालगत पायी वारीचा मार्ग वेगळा आहे. त्यावर गवत लावण्याची सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय भाजणार नाहीत व रस्त्यात निवासाच्या सोयी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. शेगाव, पंढरपूर सोलापूर ते अक्कलकोट हे पालखी मार्गही पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र बदलत आहे. असे सांगून ते म्हणाले सुरत ते अहमदनगर 12 हजार कोटीचा ग्रीन कॅरिडॉर लागू असलेला मार्ग तयार केला जाईल. 50 हजार वाहने या रस्त्यावरून चालतील 421 किलोमीटरचा हा मार्ग असून अहमदनगर हैदराबाद बंगलोर आणि पुढे चेन्नई पर्यंत तो जाईल. त्यामुळे मुंबई, पुणे, सुरत मुंबई या रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. या रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. राज्याला रस्त्यांसाठी पाच लाख कोटी आपण दिलेले आहेत. रस्त्याच्या, सिंचनाच्या, उद्योगांच्या, जलसंवर्धनाच्या बाबतीत राज्याचे चित्र बदलते आहे. बुलढाणा पेटर्नचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. आणि सरतेशेवटी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा मार्ग स्वीकारून, समाजातील गरीब माणसाची सेवा करून महाराष्ट्र आणि हा देश सुखी, संपन्न, शक्तिशाली, अधिक निर्यात करणारा बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करू असा संकल्प करण्याचे आवाहन गडकर्‍यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार