सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घरोघरी तिरंगा अभियानासाठी संपूर्ण मराठवाडा सज्ज - आ. बबनराव लोणीकर

स्वर्गीय अटलजींमुळे आज प्रत्येक घरावर झेंडा फडकवण्याचा सर्वसामान्यांना अधिकार, मोदीजींनी केली अटलजींच्या आदेशाची अंमलबजावणी

Abhimanyu
  • Aug 6 2022 3:59PM

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व राष्ट्रभिमानी जनता भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत परतूर विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा विभागातील घरे, सरकारी/खाजगी आस्थापना तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात यावे यासाठी प्रशासनासह प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्ती तत्पर असून संपूर्ण महाराष्ट्रात हे अभिमान मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहे त्यासाठी परतूर विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे सज्ज असून प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीच्या घरावर तिरंगा ध्वज फडकेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले.

“हर घर तिरंगा” उपक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी व जनजागृतीसाठी आयोजित मेळाव्या प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड सभापती संदीप भैया गोरे भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ माऊली शेजुळ पंजाबराव बोराडे बिडी पवार नागेश घारे राजेश मोरे जिजाबाई जाधव विकास पालवे गजानन देशमुख नाथराव काकडे प्रसाद बोराडे उद्धव गोंडगे सुभाष राठोड नरसिंग राठोड प्रसादराव गडदे नवनाथ खंदारे नारायण दवणे यांची प्रमुख उपस्थिती होती यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या काळात जनतेच्या घरावर, सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक संघटना, इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करण्याची परवानगी नव्हती. झेंडा देशभक्तीच,अस्मितेच प्रतीक असतो. स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांनी केलेल्या कायदा "झेंडा अधिनियम २००२"  मुळे आज घरा घरात झेंडा वंदन होत आहे. अटलजी च्या सरकार ने भारतीय झेंडा वंदन वरील सर्व निर्बंध २००२ मध्ये हटवले. काँग्रेस सरकारचा 'झेंडा अधिनियम १९५०' च्या कायद्यानुसार ध्वजारोहण हा फक्त शासकीय व प्रशासकीय कार्यलये, शाळा इत्यादी ठिकाणी करण्याची परवानगी होती. 'झेंडा अधिनियम'  प्रमाणे २६ जानेवारी २००२ पासून भारतीय ध्वज हा शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, धार्मिक संघटना,  वित्तीय, सामाजिक सर्व प्रकार च्या संस्था, रहिवाशी सोसायट्या, स्वतःच्या घरावर, सार्वजनीक चौकात आता फडकवण्यात येऊ शकतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर भारतीय तिरंगा ध्वज असावा अशी मा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांची संकल्पना आहे असेही यावेळी बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले

"हर घर तिरंगा" अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे विविध उपक्रम राबवून साजरा होतो आहे.   या महोत्सवाचा भाग म्हणून मराठवाडा विभागात “घरोघरी तिरंगा”  हा अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यत येणार आहे. परतुर विधानसभा मतदारसंघ देखील घरोघरी तिरंगा अभियानासाठी सज्ज असून प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीच्या घरावर तिरंगा ध्वज फडकलेला दिसेल.“घरोघरी तिरंगा”  हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा व समाजातील सर्वस्तरातील जनतेमध्ये  देशाभिमान जागृत करणारा व स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म्य पत्करलेल्या विरांपासून प्रेरणा घेणारा आहे. हा उत्सव साजरा करताना लोकसहभाग हा या कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण त्यात लोकांच्या भावना, विचार व मते जुळलेली आहेत. असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

*ध्वज संहितेचे पालन करत ध्वजारोहण करा - लोणीकर*
“घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी बांधव, विविध संस्था-संघटनांची मदत मिळविण्यात येत आहे. या उपक्रमात ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ध्वजसंहितेचे पालन व्हावे. ध्वज स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा. सूत, लोकर, पॉलिस्टर, सिल्कचा ध्वज लावता येईल.  प्लास्टिकचा असू नये.  त्याचा आकार ३×२ असावा.  ध्वज मळलेला किंवा फाटलेला नसावा, ध्वजसंहितेचे पालन व्हावे.   दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवाची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कार्यालयांना या संबंधी ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार असल्याचे देखील माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

*"घरोघरी तिरंगा" उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी करा - लोणीकर यांच्या प्रशासनासह उपस्थितांना सूचना*
“घरोघरी तिरंगा” उपक्रमाची प्रचार व प्रसिद्धी- सदर उपक्रमाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी प्रत्येक सरकारी अधिकारी , कर्मचारी , शिक्षक, सेवा मंडळे, लोक प्रतिनिधी यांचा सहभाग व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.  यामध्ये पोस्टर्स व बॅनर्स लावणे, शाळामधुन मुलांच्या स्पर्धा घेणे, प्रभात फेऱ्या काढणे इ. बाबींचा समावेश करण्यात यावा. तिरंगा स्वयंसेवकाच्या नेमणुका करुन त्यांच्या मार्फत कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी व अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्हास्तरावर मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालये, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळी होर्डिंग/बॅनर्स लावण्यात यावेत. जिल्हयातील शासकिय इमारती, ऐतिहासिक वास्तूंना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात यावी. गावस्तरावरील “घरोघरी तिरंगा” फडकवल्याचे ड्रोनद्वारे फोटो घेणे व व्हिडीओ शुटींग करण्यात यावे. अशा सूचना देखील यावेळी श्री लोणीकर यांनी प्रशासनासह उपस्थितांना केल्या.

“घरोघरी तिरंगा” उपक्रमाची अंमलबजावणी ही दि . ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत करण्यात येणार असल्याने यादरम्यान स्वच्छता मोहिम, महिला मेळावे, अर्थ साक्षरता, शेतकरी मेळावे, इ. बाबत तारीखवार कार्यक्रम घेण्यात यावेत, तसेच हा उपक्रम संपूर्ण कोकण विभागात यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी श्री लोणीकर यांनी केले. लोकसभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असेही लोणीकर यावेळी म्हणाले.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार