सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात

"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारावा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

Abhimanyu
  • Aug 13 2022 9:18PM

जालना -पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात साजरी करण्यात येत असून भारताच्या स्वतंत्रतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आहे. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे. त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने यावर्षी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ देशात साजरा करावा. देशातील प्रत्येक नागरिकाला देश उभारणीत आणि स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या महान योगदानाप्रती असलेली बांधिलकी आणि तळमळ दाखवण्याची ही संधी आहे. त्यासाठी घरोघरी तिरंगा लावून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करावे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

केंद्र शासनामार्फत ऑगस्ट महिन्यात संपूर्ण भारत देशात ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवली जात असून त्याच अनुषंगाने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत राज्यात ‘घरोघरी तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन देशाविषयीचा आदर व्यक्त व्हावा यासाठी आज मंठा येथे हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे सभापती संदीपभैया गोरे तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ पंजाब बोराडे नागेश घारे राजेश मोरे सुभाष राठोड नाथराव काकडे तहसीलदार कैलास वाघमारे गटविकास अधिकारी बीबी थोरात गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे, बालविकास प्रकल्पाधिकारी रमेश कोळेकर विठ्ठलराव काळे प्रसादराव गडदे प्रसाद बोराडे मुस्तफा पठाण अभाविपचे श्री गोडबोले उद्धवराव घोंडगे अशोक वायाळ सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील सर्व समाज घटकांना राजकारणासह सर्वोच्च स्थान मिळत असून खऱ्या अर्थाने वंचितांना न्याय व समतेचा अधिकार प्राप्त करून देण्यात आला आहे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मुस्लिम धर्मीय असणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित समाजातील रामनाथजी कोविंद व आता आदिवासी गावपाड्यातील महिला महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यातून "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" हा मूलमंत्र जपण्याचा प्रयत्न केला तो आपणही सर्वांनी करावा असेही यावेळी लोणीकर म्हणाले.

देशभक्ती म्हणजे देशाबद्दल प्रेम आणि आदराची भावना, देशभक्त देशावरील नि:स्वार्थ प्रेम आणि अभिमानासाठी ओळखले जातात. देशप्रेमी सतत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर असतात. देशासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आपल्या देशातही अनेक देशप्रेमी आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात सर्वांना आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. तिरंग्याशी आपले नाते वैयक्तीक न राहता ते अधिक दृढ व्हावे असे केंद्र शासनाचे मत आहे. भारतीय राष्ट्रध्वज संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतिक आहे. सर्वांनी ध्वजाचा पूर्ण आदर करावा. या उपक्रमामुळे लोकांना त्यांच्या घरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे ही या उपक्रमामागील संकल्पना आहे. असेही श्री लोणीकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

*"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारावा*
शिक्षण हे वाघिणीचे दूध असून, ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय नाही अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री लोणीकर पुढे म्हणाले की, "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण विषयक मूलमंत्र प्रत्येक विद्यार्थ्याने जपला पाहिजे विद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट अधिकारी घडल्याबरोबरच सर्वोत्कृष्ट नागरिक घडण्याचे काम देखील केवळ शिक्षण करू शकतो अशा शब्दात लोणीकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हर घर तिरंगा जनजागृती रॅलीमध्ये मंठा शहरातील सर्वच प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वरिष्ठ महाविद्यालय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते संपूर्ण परिसरात भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी संपूर्ण मंठा शहर दणाणून गेले होते भव्य स्वरूपाच्या हर घर तिरंगा जनजागृती रॅलीमुळे संपूर्ण शहर तिरंगामय झाले होते. त्यात घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा जोश बघण्यासारखा होता.

१३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी होण्यासाठी आपल्या राष्ट्रध्वजाची मागणी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफीस यांच्याकडे नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणावरुनही राष्ट्रध्वज खरेदी करु शकता. राष्ट्रध्वज कुठल्याही परिस्थितीत फाटलेला अथवा चुरगळलेला वापरु नये. तिरंगा फडकवताना नेहमी केसरी रंग वरच्या बाजूने व हिरवा रंग खालच्या बाजूने राहील याची दक्षता घ्यावी. ‘घरोघरी तिरंगा हा उपक्रम सर्वांनी राबवावा अशा सूचना देखील लोणीकर यांनी यावेळी केल्या.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर देश सातत्त्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु झालेला ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यात सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन हा उपक्रमाच्या माध्यमातून देशभक्तीला उभारी द्यावी. असे आवाहन देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार