सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात चिखली (जि.बुलडाणा) येथे जागरण - गोंधळ आंदोलनाला सुरुवात..

दिल्लीच्या आंदोलनावर तोडगा काढा.. अन्यथा महाराष्ट्रात आंदोलनाचा वणवा पेटेल - रविकांत तुपकर

Sudarshan MH
  • Dec 4 2020 11:06AM
(योगेश शर्मा)
बुलढ़ाणा : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चिखली (जि.बुलडाणा) येथे शहरातील मुख्य भागात असणाऱ्या हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर जागरण गोंधळ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. स्वतः रविकांत तुपकर यांनी भजन गाऊन आपला अनोखा अंदाज ही आंदोलनस्थळी दाखवून दिला..! यावेळी आंदोलकांनी आंदोलनस्थळीच घरून आणलेल्या ठेचा भाकरी आस्वाद घेतला. केंद्र सरकारला जागे करण्यासाठी रात्रभर जागरण - गोंधळ - भजन चालूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 'स्वाभिमानी'चे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
  केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमजोर समजू नये. महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. दिल्लीतील आंदोलनावर सरकारने तोडगा काढला नाही तर राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवू , असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित नसून ही देश वाचविण्याची लढाई आहे. यासाठी साहित्यिक,विचारवंत, बुद्धिजीवी, तरुण व समाजातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील मनाच्या व सामाजिक भान जिवंत असणाऱ्या प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत तुपकरांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांची ही लढाई केंद्र सरकार पुरती नसून, खरी लढाई अंबानी-अदाणी-मोदी विरुद्ध शेतकरी अशी आहे. असा आरोप तुपकरांनी केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार