ठाणे: मुंबईच्या शेजारी असलेल्या काशीमिरा येथील श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा आज समारोपाचा कार्यक्रम काशीगाव या ठिकाणी होता. त्या अनुषंगाने मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय श्री. मनोज जरांगे पाटील यांनी काशिमिरा जरीमरी तलावाजवळील पटांगणास भेट दिली. भेट देऊन त्यांनी मराठा आरक्षणामध्ये वारकरी संप्रदायाचा फार मोठा व मोलाचा वाटा आहे याची ग्वाही दिली व पुन्हा एकदा मराठी आरक्षणाच्या मुद्द्याला हवा देऊन उपस्थित जनसमुदायाचा उत्साह वाढविला.
यावेळी ते म्हणाले, सदर व्यासपीठ हे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ असल्याने ह्या ठिकाणी जातीचे राजकारण करणे योग्य नाही. वारकरी संप्रदायात सर्व जातीचे लोक समाविष्ट विशिष्ट समाजाच्या प्रश्नाचा मुद्दा न घेणे योग्यच आहे. परंतु मराठी अरक्षणाविरुद्ध कोणाचे काहीही ऐकणार नाही. असे बोलून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे मराठी आरक्षणाचा मुद्दा येणाऱ्या मतदानामध्ये फार महत्वाचा विषय असणार आहे.