सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेच मात्र पोलीस प्रशासन ढिंम

शहरात : दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे.साईनगरीत घरफोडी झाल्याचे समोर आले आहे.

Nandurbar MH
  • Aug 7 2021 5:44PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे

शहरात : दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे.साईनगरीत घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. घरातील सर्व सदस्य गावी गेलेले होते. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील चार ते पाच लाखांचे ऐवज लंपास झाले आहे.रोख रकमेसह दागदागीने चोरले. ही बाब समोर येताच नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साई नगरीतील पुरोहित उल्हास यशवंत पाथरकर या आपल्या कुटुंबिंयांसमवेत राहतात. रात्री त्यांच्या घरात पुजाविधी कार्यक्रमाची तयारी करून त्याचे तिन्ही बंधू 11 वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच कडी कोंडा तोडून घरातील काळ्या रंगाची बॅग मधील 30 ते 40 हजार रोख रकमेसह  सोन्याचे 8-10 तोळे दागदागीने लंपास केले. 

शुक्रवारी पुजाविधी करण्यासाठी हेमंत पाथरकर, गिरिश पाथरकर, अजित पाथरकर घरी आले असता.गेटचे व घराच्या दरवाज्याचे लॉक तोडलेले दिसले. लगेच पोलिसांना फोन केला त्यानंतर घराची पाहणी केली असता घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. किचन मधील पकड, कैचीचा वापर करत बेडरूममधील कपाट फोडले कपाटातील रोख रकमेसह दाग दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. साईनगरीत चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली सदर घटनेचा पंचनामा देखील करण्यात आला आहे लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

रात्री दोन वाजून 50 मिनिटांनी पोलिस गाडी साईनगरीतून गेली आहे. सीसीटीव्ही मध्ये पोलिस गाडी दिसून आली चोरटे मात्र दिसून आले नाही.चोरटे सराईत आणि जाणकार चोर असल्याचे बोलले जात आहे. नवापूर शहरात पोलिस गस्त घालत असले तरी चोरीचे प्रकार वाढतच आहे यावर ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार