सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आणिबाणीचे अंधःकार पर्व

रशियातील एका नेत्याला विचारले होते की, ‘तुमच्याकडे राजकीय कैदी आहेत काय’? त्याला रशियन नेत्याने उत्तर दिले होत, राजकीय कैदी ही काय जमात असते? आम्ही विरोध करणार्‍यांना सरळ गोळ्या घालतो. त्यावरून हा भारतीय नेता म्हणतो ‘धन्यवाद द्या मित्रांनो, तुम्हाला किमान आम्ही गोळ्या घातल्या नाहीत.’ हा होता आणिबाणीचा काळ

सुधीर पाठक
  • Jun 25 2020 10:41PM
Thanks, No Bullets’   हे शीर्षक होते आणिबाणी काळातील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे एका कॉग्रेसी नेत्याचा भाषणाचे वृत्त देताना त्यात रशियाचा उल्लेख होता (हा रशिया आजचा नाही तर 1975 सालचा होता) रशियातील एका नेत्याला विचारले होते की, ‘तुमच्याकडे राजकीय कैदी आहेत काय’? त्याला रशियन नेत्याने उत्तर दिले होत, राजकीय कैदी ही काय जमात असते? आम्ही विरोध करणार्‍यांना सरळ गोळ्या घालतो. त्यावरून हा भारतीय नेता म्हणतो ‘धन्यवाद द्या मित्रांनो, तुम्हाला किमान आम्ही गोळ्या घातल्या नाहीत.’ हा होता आणिबाणीचा काळ ...45 वर्षे झालीत. 25 जून 1975 च्या मध्यरात्री नंतर देशात आणिबाणि लागली होती.ती 18 जानेवारी 77 ला निवडणूक घोषित झाल्यावर, काहीशी शिथिल झाली होती.व इंदिरा गांधी व काँग्रेस पक्ष यांच्या दारूण पराभवानंतर संपली होती.12 जून 1975 ला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या.जे.एम.एल सिन्हा यांनी एक निकाल देऊन सांगितल होते की, निवडणूक प्रचारात गैरव्यवहार केल्याने श्रीमती गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व समाप्त करण्यात येत आहे. मात्र त्या पंतप्रधान असल्यामुळे संसदेत जावू शकतील मात्र त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही. या निर्णयानंतर खरे तर श्रीमती गांधीनी राजीनामा द्यायचा, नवीन पंतप्रधान निवडून काँग्रेस सरकार चालले असते. पण ते करण्या एवजी श्रीमती गांधीच्या निवास स्थाना समोर ट्रक भरभरून माणसे, कार्यकर्ते,महिला,मुलबाळे आणण्यात आलीत व घोषणा सुरू झाल्यात “इंदिराजी डटे रहो हम तुम्हारे साथ है ”त्याचे आयोजकही जनतेला दिसत होते. ते संजय गांधी प्रमुख्याने होते. एका दिवसात इंदिराजींच्या निवासस्थानापुढे 20,25 रॅली होत.या उलट सामान्य जनमानसात या वर्तनामुळे रोष वाढत होता. त्यांचा प्रस्फोट म्हणून जयप्रकाश नारायण यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्यांची सभा 25 जून ला आयोजित केली होती.या सभेला लोकांनी जाऊू नये म्हणून त्या काळचा अत्यंत लोकप्रिय चित्रपट ‘बॉबी’ टी.व्ही वरून या सभेच्या वेळला लावण्यात आला होता.तो काळ आजच्या सारख्या वाहिन्यांचा पेव फुटला नव्हता घरून दूरदर्शनच दिसत अस, त्या चित्रपटाला गर्दी होत. टी.व्हीे समोर लोक बसून राहातात, हा अनुभव होता पण त्या सभेला प्रचंड गर्दी उसळली त्यात जपूजींनी इंदिरा गांधी यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी केली. त्याच वेळी त्यांनी पोलीसांनाही आवाहन केले की तुम्हाला बेकायदेशीर आदेश मिळाले तर ते पाळू नका हा उल्लेख पोलीस म्यॅनुअल मध्येही आहे. पण त्याला  काँग्रेसने असं वळण दिलं की जयप्रकाशजींनी पोलीस व लष्कराला बंडाची चिथावणी दिली. 25 जून 75 च्या मध्यरात्री नंतर झोपेतून उठवून उठवून एकेका नेत्याला अटक करण्यात आली. आणिबाणी लावण्यापूर्वी कॅबिनेट मिटिंग व्हायला हवी पण इंदिराजींनी सांगितले व तत्कालीन राष्ट्रपती फकृद्दिन अली अहमद यांनी आणिबाणीच्या दस्तावैजावर सही केली. त्यानंतर 26 ला सकाळी कॅबिनेट बैठक झाली. त्या रात्री कुठल्याही वृत्तपत्रात बातमी येऊ नये म्हणून प्रमुख शहरातील वीज घालविण्यात आली त्यामुळे वृत्तपत्रे निघु शकली नाही. 26 पासून आणिबाणीचा वरवंटा सुरू झाला.काँग्रेस व कम्युनिस्ट वगळता सर्व विरोधकांना कोणत्याही आदेशाविना कारागृहात डांबत, रा.स्व.संघ, जमाते इस्लामी, आनंदमार्ग या संघटनांवर बंदी घालण्यात आली. त्याच्या कार्यालयावर छापे घालण्यात आले.रा.स्व.संघच्या कार्यालयात स्वयंसेवकांना शिकविण्यासाठी लाकडी अन् धार नसलेल्या तलवारी होत्या याचे प्रदर्शन सांगण्यात येवून इतक्या तलवारी जप्त वैगरे सारख्या बातम्या टी.व्ही चित्रपटातील समाचार वृत्त या मध्ये झळकविण्यात आल्यात आणिबाणीतील प्रमुख विरोधक म्हणून जयप्रकाजींना त्यांची प्रकृती ठीक नसतांनाही अटक करण्यात आली.हरयाणा येथील डाकबंगल्यात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. जपूजी त्यावर फक्त इतकेच म्हणाले “विनाश काले विपरित बुद्धी” अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातही आणली नव्हती अशी बंधने वृत्तपत्रांवर घालण्यात आलीत.ब्रिटीश काळात काही विरूद्ध छापले की वृत्तपत्रांचे अंक जप्त होत.वृत्तपत्राच्या संपादकाकडून जमानत म्हणून रोख रकमेची हमी घेतली जात होती पण आणिबाणीने  त्यापेक्षाही कठोर निर्बंध लादलेत. यापूर्वी भारतात कधीही लागू न झालेली प्रसिद्धीपूर्व नियंत्रणे लादण्यात आली  फक्त अग्रलेख नव्हे तर अतिशय निरूपद्रवी असणारे आजचे कार्यक्रमही पोलिसांकडून मंजूर झाल्यावर प्रसिद्ध होऊ शकत. सुरवातीला पोलिस अधिकारीच ही कामे करीत. नंतर सेंन्सॉर अधिकारी असे. केंद्र सरकारचे माहिती व नभोवणी खाते राज्य सरकारचे प्रसिद्धी खाते काही पत्रकार यांच्या मदतीने सर्व पातळीवर प्रसिद्धी पूर्व नियंत्रणे लादण्यात आलीत. साधारणपणे सरकारने कुठलेही निर्बंध घातलेत की त्याला आव्हान देण्याची मुभा लोकशाहीने आपल्याला दिलेली आहे पण तो अधिकार देखील काढून घेण्यात आला ना निदर्शने जनता करू शकत होती, ना मोर्चा काढून निवेदन देता येत होते. अगदी शेवटचा मार्ग जनतेला उपलब्ध राहतो तो न्यायालयात जाण्याचा पण या सर्व सरकारने बंद केले होते.मूलभूत स्वातंत्र्याचा जो भाग संविधानात होता तोच अधिकार काढण्यात आला. न्यायालयवरही इंदिराजींनी कमिटेड ज्युडिशियरीचा प्रयोग केला होता. आपल्या मर्जीतील होयबा सरन्यायाधीश नेमले गेले होते.सर्वोच्च व उच्चन्यायालयही सरकार विरोधी मत प्रदर्शन करकाची प्रज्ञा असणारी मंडळी न्यायमूर्ती होणार नाहीत, याची दक्षता घेतली होती. शिवाय धडाधडा वटहुकूम काढून प्रस्थापित कायद्यात सरकारनुकूल बदल करण्यात आलेत. न्या.जे.एम.एल. सिन्हा यांनी जो निकाल दिला होता त्याला इंदिरा गांधीनी सर्वोच्य न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे व्ही. के. कृष्णा अय्यर यांच्या पुढे तो सुनावणीला आला त्यावेळी न्या. अय्यर म्हणाले की ‘आज जे कायदे अस्तित्वात आहेत त्यानुसार इंदिरा गांधीवर अपात्र ठरविण्याचा जो आदेश दिला होता तो निरस्त होत आहे.’ पं बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर राय,केंद्रीय मंत्री न्या.हरिभाऊ गोखले ही मंडळी कायद्याची बाजू बघत होते.तर वृत्तपत्रीय नियंत्रणासाठी माहिती व नभोवाणी मंत्री विद्याचरण शुक्ल होते. गृहखाते पी.सी.सेठी व त्यांचे राज्यमंत्री म्हणून ओम मेहता काम बघत होते.सर्व हडेलहप्पी सुरू झाली होती. हरयाणातील मुख्यमंत्री बन्सीलाल हे दडपशहा म्हणून कारकीर्द गाजवित होते. नवीन कायद्यामुळे स्थान बद्धतेला न्यायालयात आव्हान ही देता येत नव्हते.खर्‍या अर्थाने मुस्कटदाबी सुरू झाली होती.जनक्षोभ कमी होण्याची संधी नव्हतीःस्थानबद्ध करण्यात आलेल्यांची यादी तयार होताना अनेक स्थानिक नेत्यांनी आपला राग आपल्या विरोधकांवर काढून घेतला त्यामुळे कोण गजाआड कधी जाईल याचा नेम उरला नाही.याचा फटका तरूण भारताला बसला. त.भा. चे प्रकाशन करणार्‍या श्री. नरकेसरी प्रकाशन चे अध्यक्ष,सरव्यवस्थापक,जाहिरात प्रतिनिधी,व्यवस्थापक,जिल्हा प्रतिनिधी,स्थानिक वार्ताहर कारागृहात होते.या शिवाय त.भा.च्या मुख्य संपादकांना आक्टोबर 75 मध्ये मिसामध्ये बंद करण्यात आले.इंडियन एक्सप्रेस व तरूण भारत हे मुख्य लक्ष्य होते. विर्दभात जागोजागी फॅसिष्टविरोधी परिषदेचे आयोजन कम्युनिष्टांनी केले व त्यातून भारत बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय सरकारने बेगुमानपणे अकार्यक्षम ठरवित केद्रीय मंत्रीमंडळातील मोहन धारिया व चंद्रशेखर यांनी विरोध करताच त्यांनाही गजाआड करण्यात आले. मंत्रीमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. अधिकारी यांना सेवामुक्त करणे प्रारंभ केले.या व्यतिरिक्त प्रचार मात्र होत होता गाड्या वेळेवर धावतात,कर्मचारी कामावर वेळेवर येतात याचा सर्वत्र शिस्त आहे याचे गोडवे गाणे सुरू होते. इंदिरा गांधीनी वीस कलमी कार्यक्रम घोषित केला तर संजय गांधी यांच्या युवक काँग्रेसने 5 कलमी कार्यक्रम दिला.ठिकठिकाणी त्यांच्या गौरवाचे कार्यक्रम सुरू झाले. संजय गांधी यांचा सत्ताकारणातील हस्तक्षेप पराकोटीला गेला. त्यांनी कुटूंब नियोजनाचा कार्यक्रम हाती घेतला ठरलेल्या उद्ष्टिा प्रमाणे केसेस आणल्या नाहीत तर शिक्षकांना पगार मिळत नसे.नसबंदीचा कार्यक्रम फार जोराने म्हणजे अत्याचार वाटावा इतक्या जोराने राबविण्यात आला त्यामुळे घरातील पुरूष माणसे शेतात लपून राहू लागले.तो तरूण आहे प्रजनन क्षमतेचा आहे किंवा नाही याचा विचार न करता दिसेल त्याची नसबंदी सुरू झाली. आवाज तर उठविता येत नव्हता. संपूर्ण अंधःकारमय वातावरण असतांना संघाने सत्याग्रह सुरू केला. देशभर हजारो स्वयंसेवक भारत सुरक्षा कायद्याखाली कारागृहात डांबले गेलेत. भारत मातेचा जयजयकार करतांना  तरूणांना अटक वैगरे बातम्या देता येऊ लागल्या. श्रीमती इंदिरा गांधीवर बेतलेल्या आंधी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. नहाटा यांनी किस्सा खुर्सी का हा चित्रपट काढला होता तो सेन्सॉर ने संमत केला नाही. चित्रपटात कोणाला भूमिका द्यावी, देऊ नये याचाही निर्णय सिनेक्षेत्रा बाहेरील मंडळी घेऊ लागली. नाही म्हणायला दुर्गा भागवत, पु.ल. देशपांडे यांनी विरोधांचा क्षीण का होईना सुर लावला. जगमोहन रूखसाना, सुल्ताना, असे अनेक आणिबाणीचे दिवटे निघाले. कुठेही विरोधांचा सूर येत नाही हे बघुन श्रीमती गांधी शांतावल्या त्याच, वेळी जॉर्ज फर्नाडिस,वीरेन शहा वैगरेना पण कारागृहात डांबण्यात आले. कारागृहात एकत्र राहिल्या मुळे आपण ज्यांचा विरोध करतो ते रा.स्व. संघवाले व समाजवादी इतके वाईट नाही याची जाणिव कारागृहातील मंडळींना झाली. त्यांच्यातील मतभेद पुष्कळ प्रमाणात संपुष्टात आले.विरोधी पण आता संपले आहेत हे मनात पक्के करून श्रीमती गांधीनी 18 जानेवारी 77 ला देशात निवडणुकीची घोषणा केली. वरवर बघता विजय होईल, कुठलाही विरोध होणार नाही असे वातावरण होते पण एकदम वाट निसटावी आणि विरोधी शक्ती उभी झाली. केद्रीय मंत्रिमंडळातील जगजीवनराम यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला. सर्वांनी आपले पक्ष विर्सजित केले. एक दिलाने निवडणूक लढविली. उत्तर भारतात नर्मदेच्या वर कॉग्रेसला एकही जागा मिळाली नाही.(अपवाद-छिंदवाडा) पण नर्मदे खाली दक्षिणच्या राज्यात श्रीमती गांधींना पाठिंबा मिळाला. निवडणुकांचे निकाल येताच आणिबाणी मागे घेण्यात आली सव स्थानबद्ध मुक्त झाले. आणिबाणीचे अंधार पर्व संपले.रा.स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी ‘विसरा व क्षमा करा’ अशी भूमिका घेतली पण सरकारने मात्र शहा कमिशन वैैगर नेमून चौैकशी सुरू केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा पुरस्कार वापसी गँग अघोषित आणिबाणी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, असे म्हणते तेव्हा सहज मनात येते. या सगळ्यांना पुन्हा आणिबाणी पर्वात पाठवले पाहिजे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की या देशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती मोल चुकविले आहे. किंमत दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार