सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोकनेते बाबुराव कदम यांनी आयोजित केलेल्या भारतीय सैन्य दल यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sudarshan MH
  • Jan 29 2021 7:40PM
 
हदगाव दि.29(अरविंद जाधव) हदगाव शहरातील माहेश्वरी भवन येथे आज आयोजित केलेल्या भारतीय सैन्य दल युपीएससी-एमपीएससी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिराला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 या मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी तथा हदगाव तहसीलचे तहसीलदार जीवराज दापकर, पुणे येथील युनिक अकॅडमीचे मनोहर भोळे, पुणे येथील यशदा चे डॉक्टर बबनराव जोगदंड, पुणे येथील माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड, पुणे येथील सेवानिवृत्त सुभेदार सेंटर पुणे मार्गदर्शक युवा मिलिटरी अकॅडमी चे श्री गजाननराव हमपले ,प्राध्यापक राजेश सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस नांदेड , माजी आमदार शेतकरी नेते पाशा पटेल,श्रीकांत पवार इंडियन आर्मी बेंगलोर ट्रेनिंग सेंटर,हदगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, शिवाजीराव कपाळे, डी एम नामेवार, परमेश्वर घागरदरे, प्राध्यापक भार्गव राज्य संचालक भार्गव करिअर अकॅडमी नांदेड माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, व्यासपीठावर विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक टिकोरे, गोपाल भाऊ सारडा, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे, माजी सभापती बाळासाहेब कदम,आयोजक लोकनेते बाबुरावजी कदम आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सुदर्शन पाटील , बबनराव कदम, मंचक राव कदम, राजू तावडे, निळू पाटील, तातेराव पाटील वाकोडे, आदींसह असंख्य बाबुराव कदम समर्थकांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गोपाल भाऊ सारडा व शिवव्याख्याते गजानन जाधव तसेच पांडुरंग कदम हरडफकर आदींनी केले . सर्व उपस्थितांचे आभार आयोजक लोकनेते बाबुराव कदम यांनी मानले व तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.हदगाव तालुक्यात असे भव्य दिवे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिर सर्व प्रथम लोकनेते बाबुरावजी कदम यांनी आयोजित केल्यामुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार