नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
प्रवाशांच्या मागणी वरुन महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महा संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाठक यांनी दिनांक 17/8/2021 रोजी
मा.विभाग नियंत्रकसो यांना भ्रमण ध्वनीच्या माध्यमातून निवेदन पाठवले होते सोबत आगार व्यवस्थापकांना ही निवेदन पाठवले होते दोघांनी आपसात चर्चा करुन सदरची नवापूर देवमोगरा ही गाडी दि.18/8/2021 पासून सुरु करण्यात आली आहे.
.. नवापूर शहरातून तहसिल कार्यालय, पंचायत समिती, महावितरण, प्रथमिक शाळेचे शिक्षक ,परिचारिका, रोज
अपडाउन करत होते. करोनाच्या काळात ही बससेवा बंद करण्यात आली होती. ती परत सुरू करावी म्हणून प्रवासी महा संघाकडे या बाबत तक्रार करण्यात आली
असता विभाग नियंत्रकांना व आगार व्यवस्थापकांना मोबाईल च्या माध्यमातून
विनंती करण्यात आली होती ती त्यांनी मंजूर केली त्या बद्दल संघातर्फे त्यांचे आभार जप्त करण्यात आले त्याप्रसंगी विभागीय साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गणेश वडनेरे एस.बी.आहिरे, सचिन पाटील ATI,एल.बी.ब्राम्हणे चालक, वाहक रिता मावची,आर. बी.शेख,ए.जे.वळवी,के एस.बहिरम.प्रवासी रवी पवार,व प्रवासी बांधव उपस्थित होते
प्रवासी बांधवांना नम्र विनंती की फक्त तक्रार करु नका तीचा योग्य तो फायदा घ्या सध्या महामंडळाची नाजुक परिस्थिती
आहे तसेच महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात अनावधानाने अपधात झाल्यास विम्याचे
संरक्षण आहे तेव्हा खाजगी वाहनाने प्रवास करणे टाळा आणि आपला प्रवास
सुखाचा करा हिच शुभेच्छा.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333