औरंगाबाद - जिल्ह्यातील चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमातील प्रियशरण महाराजांवर अज्ञात सात ते आठ लोकांनी मारहाण केली
औरंगाबाद - जिल्ह्यातील चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या
औरंगाबाद - जिल्ह्यातील चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमातील प्रियशरण महाराजांवर अज्ञात सात ते आठ लोकांनी मारहाण केली आहे, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून फुलंब्री पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून रात्री आश्रमाच्या दरवाज्याची कडी तोडत इसमांनी आत मध्ये प्रवेश केला व प्रियशरण महाराजांवर चाकूने हल्ला केला यात महाराजांच्या डाव्या खांद्यावर जखम झाली आहे.
अशी घडली घटना...
बुधवारी रात्री आश्रमाच्या इमारतीतील मागील दरवाजा तोडून सात ते आठ अज्ञातांनी आश्रमात प्रवेश केला. खोलीत असलेल्या एका महिलेला धमकावत महाराज कुठे आहे अशी विचारणा केली, तिने घाबरून महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिल्यानंतर हल्लेखोरांनी तिकडे आपला मोर्चा वळवला, महाराज झोपले असताना त्यांना उठवत त्यांना जबर मारहाण करायला सुरुवात केली. महाराजांनी प्रतिकार केला त्यावेळेस महाराजांच्या डाव्या दंडावर वार झाला त्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महाराजांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही...
प्रियशरण महाराजांवर चाकूने वार आणि मारहाण करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ला करणाऱ्यांनी कुठल्याही वस्तूला हात लावला नाही, कुठल्या प्रकारची चोरी केली नाही. यामुळे झालेला हल्ला चोरीच्या नाही तर सुडीच्या उद्देशाने हल्ला केल्या असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प