बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथे ग्रामपंचायत निवडणुक प्रकरणी दोन गटात तुंबळ हाणामारी बिलोली
ग्रामपंचायत निवडणुक प्रकरणी दोन गटात तुंबळ हाणामारी बिलोली
नांदेड/बिलोली दि.18 (अरविंद जाधव): तालुक्यातील मौजे मुतन्याळ येथील ग्रामपंचायत निवडणुक तणावपुर्ण वातावरणात झाली. ग्रा.प,सदस्या सँख्या ९ आसुन माजी सरपंच स, जलील मोहीयोदिन व सोमदास जक्कलवार असे दोन पनल होते,
निवडणुकीची राग मनात ठेवुन दि. १६ जानेवारी रोजी सकाळी येथील दोन गटात भांडण झाल्याने त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. तथाकथीत गावगुन्डा ने सगरोळी, चिंचाळा, बडुर येथुन काही तरुणाना काठ्या लाठ्यासह मुतन्याळ ला पाठवले . बाहेर गावाचे लोकाना का बोलावले ? प्रथम दगडफेक करण्यात आली. घरात घुसुन युवक महीला व मुलाना मारहाण करण्यात आली. यात विस लोक जखमी झाले. एकाचा हात तुटला, बिलोली ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना सोबत एका युवकास शासकीय रुग्णालयात गुन्डाने मारहाण केली. हि घटना निंदणीय आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागे सुध्दा आसे प्रकार घडले होते. दुपारी वरिष्ठ कार्यालयाचे आडीशनल एस. पी . निलेश मोरे नांदेड यानी बिलोलीला भेट दिली, मुतनाळ येथे राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले. तणावपुर्ण शांतता आहे. सदर गुन्हयाची फिर्याद ए. पी. आय. रामदास केन्द्रे यानी देवुन.दोन्ही समाजाचे मिळुन एक़दर ८० जणावर भा.द . वि. चे कलम ३३०,३४३, ३२३, ३०७, इतर कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ३८ आरोपीना अटक करण्यात आसुन ४२ जण फरार आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहे. चौकशी चालु आसल्याची माहीती पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यानी सांगीतले. सदर प्रकरणी पो. नि. भगवानराव धबडगे हे मदत करीत आहेत. अशी माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देष्वर धुमाळ यानी दिली.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प