सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाबासाहेब नाईक सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगांवकर यांचा महत्वपूर्ण निर्णय

गिरणी कामगाराला मासिक ७५० रुपये वेतन वाढ देणार* *२८० कामगारांना होणार लाभ* *कामगारांकडुन निर्णयाचे स्वागत*

Sudarshan MH
  • Mar 5 2021 5:50PM
 
 
*यवतमाळ* - *प्रतिनिधी किरण* *मुक्कावार* *9767271001* एकीकडे माहराष्ट्रातील अनेक सूतगिरण्या बंद पडत असताना विदर्भातील बाबासाहेब नाईक सूतगिरणीने पूर्ण कार्यक्षमतेने विदर्भात पहिला क्रमांक मिळविला आहे.
 कोरोनाच्या काळात मंदीची लाट असतानासुद्धा सूत उत्पादनात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीने गगन भरारी घेतली आहे. 
बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीने दर्जेदार सुताची निर्मिती केल्यामुळे या सुताला विदेशातून मोठी मागणी आहे. त्यामुळे या गिरणीच्या दर्जदार सुताची निर्यात जगात अनेक देशात सातासमुद्रापार केली जात आहे.
 संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, बाबासाहेब नाईक सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगांवकर,गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम.आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे टाळेबंदीनंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून ८९ टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे.
सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेंगावकर व उपाध्यक्ष ययाती नाईक हे सभासदाच्या हितासाठी व कामगारासाठी धाडसी निर्णय घेत असल्यामुळे. प्रत्येकी ठिकाणी होणाऱ्या खर्चावर त्यांचे बारकाईने अंकुश आहे. त्यामुळे सूतगिरणीचे उत्पादन फार मोठया प्रमाणात सुरू आहे. मागील वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव वाढला असताना सूतगिरणीचे कामकाज काही दिवस बंद ठेवल्यानंतर गिरणीचे अध्यक्ष राजेश आसेंगावकर यांनी कामगारांना स्वखर्चाने अन्नधान्य किट, मास्क सॅनिटयझर,वाटप केले. 
त्यामुळे कामगारांनी त्यांना धन्यवाद दिले. 
सूतगिरणी सुरू झाल्यानंतर कामगारांनी आपआपल्या पाळीमध्ये येऊन अहोरात्र काम करत श्रमप्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवून सातत्याने काम केले.
 त्यामुळे बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेंगावकर यांनी कामगार हिताचे अनेक निर्णय घेतले त्यापैकी पुन्हा आणखी एक हा महत्वकांशी निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२१ पासून प्रत्येक कामगाराला मासिक ७५० रुपये वेतन वाढ देण्याचे त्यांनी जाहीर केले. याचा लाभ २८० कामगारांना होणार आहे. या वेतन वाढीमुळे गिरणीतील कामगारांना दरमहा २ लाख १० हजारांचा लाभ मिळणार असून गिरणीवर मात्र वार्षिक २५ लाखाचा बोजा पडणार आहे.  
कोरोना व संचारबंदीच्या या काळात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. राजेश आसेंगावकर यांनी अध्यक्षपदाचीसूत्रे हाती घेतल्यापासून सूतगिरणीने विकासावर भर दिला आहे. कामगारांना केंद्रस्थानी मानून त्यांनी सुताचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 
कोरोनाच्या काळातही सूतगिरणी सुरू राहावी आणि कामगारांच्या हाताला सातत्याने काम मिळावे, याचे नियोजन करण्यात आले. तसेच बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी आशिया खंडात नावारुपाला आणण्यासाठी उत्पादनावर त्यांनी अधिक भर देण्यात येत आहे.
  लॉकडाऊन काळात सूतगिरणीने उपलब्ध असलेल्या टीएफओ या अद्यावत यंत्रावर तयार करण्यात आलेले १६ काउंटचे २०० टन सूत चीन व हॉंगकॉंग या देशात निर्यात करण्यात आले.यामुळे कामगारांच्या परिश्रमाची दखल घेत आता वार्षिक २५ लाख रुपये वेतनवाढही घोषित केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार