सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रतिमापूजन

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा, याहा मोगी माता, क्रांतिवीर खाज्या नाईक, तंट्या भिल,विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Nandurbar MH
  • Aug 9 2021 5:37PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा, याहा मोगी माता, क्रांतिवीर खाज्या नाईक, तंट्या भिल,विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमापूजन नवापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री शिरिषकुमार नाईक, पोलीस निरीक्षक श्री, भापकर, संस्थेचे सचिव श्री.तानाजीराव वळवी, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री आरिफभाई बलेसरीया, मा.संचालक श्री दिलीप पवार,
मा,संचालक श्री विनोद नाईक, नगराध्यक्षा सौ.हेमलताताई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जी जयस्वाल,उपप्राचार्य प्रा. वाय.जी भदाने या  सर्व मान्यवरांनी क्रांती वीरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.  कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  करण्यात आला.
राष्ट्रीय पथसंचलन नवी दिल्ली या ठिकाणी 26 जानेवारी 2021 ला  कु. प्रीती पाडवी हिने सहभाग घेऊन उत्कृष्ट पथसंचलन केले.
त्याबद्दल आमदार श्री         शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट छात्र संसद पुरस्कार विजेता उमेश कोकणी यांचा सत्कार नवापूर पोलीस विभागाचे पोलिस निरीक्षक श्री. भापकर  यांनी केला. उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू रोहिणी कोकणी हिचा सत्कार नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील  यांनी केला.
उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू मनिष गावित यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री.तानाजीराव वळवी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गेडाम यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.छाया गावित,राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक अधिकारी प्रा.ए. ए मुळे व विद्यार्थी  विकास अधिकारी प्रा. जी .एस बोरदे, विद्यार्थी विकास सहाय्यक अधिकारी डॉ.एस बी महाजन यांनी  केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार