सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद.एफआयर नाही तपास नाही...

एफआयर नसल्यास तपास होऊ शकणार नाही. तुमच्यासाठी कायदा बाजूला ठेवला पाहिजे का? परमबीर सिंह यांना हायकोर्टाचा सवाल..

Snehal Joshi. MH
  • Mar 31 2021 4:02PM
 

 
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी होत आहे. 
परमबीर सिंग यांच्यावतीनं विक्रम ननकानी यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. तर, अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजूनं मांडत आहेत. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचं आहे. आरोपांविषयीचं तथ्य बाहेर आणायचं आहे त्यामुळं ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला. यानंतर न्यायालयानं तथ्य मांडण्यास
ननकानी यांनी युक्तिवाद करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं पत्र लिहून 11 दिवस झाले आहेत. या प्रकरणी पोलीस दलाला आलेल्या अडचणी सांगतो, असं म्हटलं. तर कोर्टानं एवढी गर्दी केलीय असा सवाल केला.
पुढे ननकानी यांनी परमबीर यांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवली. पत्रामध्ये परमबीर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विक्रम ननकानी यांनी दादरा नगर हवेली खासदार आत्महत्या प्रकरणाचा ही उल्लेख केला. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात अनिल देशमुख हस्तक्षेप करत असलाचा परमबीर सिंहचा आरोप आहे.
न्यायमूर्ती दत्ता यांच्याकडून एफआयआरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तुम्हाला पोलिसांकडे जाण्यापासून कोणी रोखलं होतं.प्रथमदर्शनी एफआयर नसल्यास तपास होऊ शकणार नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार