सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मलकापूरचे उपनगरध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या वाढदिवशी नाचवल्या नंग्या तलवारी

दोघाना अटक : ५ तलवारी जप्त* *नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे मौन*

Sudarshan MH
  • Feb 11 2021 3:36PM
 
 
 (योगेश शर्मा)
*बुलढाणा :* राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढदिवसाचा केक कधी तलवारीने कापण्याचा तर कधी तलवार हवेत फिरवत आपला मोठेपणा मिरविण्याची क्रेझ वाढत आहे. धारदार तलवारी कार्यक्रमाच्या स्थळी हाताळणे हा गुन्हा आहे. असे असतांनाही मलकापूर नगरपालिकेचे उपनगरध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी लखलखती तलवार हवेत फिरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करत स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा दोघा युवकांनाअटक करून त्यांच्याकडून ५ तलवारी जप्त केल्या असून त्यांचे विरुद्ध आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार नगर पालिकेच्या मालकीच्या जागेत घडून देखील त्यावर कारवाई करण्याऐवजी स्थानिक नगभराध्यक्ष अॅड. हरीश रावळ आणि पालिका मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी या प्रकरणी सोयिस्कर मौन बाळगले आहे. 
       वाढदिवशी काहीतरी वेगळे करत प्रसिद्धी मिळविण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून नेत्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचा सपाटा सुरु आहे. यात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी आणि चाकूचा वापर सर्रास वाढला आहे. याचीच पुनरावृत्ती करत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र वारंवार अशा प्रकारचे स्टंट पाहून नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेचे उपनगरध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी लखलखत्या तलवारी हवेत फिरविल्याचे चे व्हिडीओ व्हायरल करत स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे. मलकापूर शहरातील नगर पालिकेच्या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यान्नि असंख्य तलवारी हवेत फिरविल्या एव्हडेच नव्हे तर विविध प्रकारचे नारे हि यावेळी दिल्याने शहरात खळबळ उडाली. मलकापूर शहर मागील काही दिवसांपासून संवेदनशील होत चालायचे मागील काही दंगलीवरून दिसून येते. अश्यातच रात्री तलवारी निघाल्याने नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
        दुसरीकडे सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी दाखल घेत रात्री उशिरा दोघा युवकांना अटक केली. त्यांच्याकडून ५ तलवारी जप्त केल्या असून त्यांचे विरुद्ध आर्म ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
  *नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे मौन*
       हा विषय राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असल्याने तसेच पालिका निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपल्याने या प्रकरणापासून स्वतः ला दूर ठेवण्याची भूमिका मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी घेतली आहे. सदर प्रकार नगर पालिकेच्या मालकीच्या जागेत घडून देखील अद्याप या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई पालिका प्रशासनाने केली नाही. मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे देऊन आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार