सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर वरिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी गुंफले आठवणीतील मोती

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवातले महाविद्यालय कसे होते

Nandurbar MH
  • Jul 20 2021 10:18AM


नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे

     कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवातले महाविद्यालय कसे होते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाने कुठले उपक्रम राबवले व त्यांचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर कसा परिणाम झाला, महाविद्यालयातील पायाभूत सुविधांमध्ये कालानुरूप कसे बदल होत गेले, महाविद्यालयात शिकवले जाणारे अभ्यासक्रम वेळेनुसार कसे बदलत गेले, महाविद्यालयाचे त्यांच्या आयुष्यातले स्थान काय या सर्व बाबींवर महाविद्यालयाच्या सर्व घटकांकडून लेख संग्रहीत केले. एकूण 215 पानांच्या या ग्रंथात बहात्तर लेख मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात आलेले आहेत.  या लेखांना संपादित केले आहे प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल, प्रा. आर. के. तुपे, प्रा. जे. डी. साळी, डॉ. सी. एल. सुरवाडे व डॉ. एस. एस. पुलावळे यांनी. या सर्व लेखकांना अथर्व प्रकाशन जळगाव यांच्या मदतीने पुस्तकाचे स्वरूप दिले गेले. पुस्तकाला विषयाला साजेसे नाव अशी पाखरे येती हे आहे. नुकतेच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय आमदार श्री शिरीषकुमार नाईक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार